VASAI CATHOLIC CHURCH SONGS

Vasai Catholic Church Songs Lyrics Available This Site

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

आलो तुझ्या दर्शनाला देवा






आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


मंदिर तुझे सुंदर पावन

मंदिर तुझे सुंदर पावन 

मनात अमुच्या तुझेच चिंतन 

आलो तुझ्या दर्शनाला...


आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


चरण पाहता तुझेच देवा 

चरण पाहता तुझेच देवा 

येई अर्थ अमुच्या जगण्याला

आलो तुझ्या दर्शनाला...


आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


सुमधूर सूर हे अमुचे देवा 

सुमधूर सूर हे अमुचे देवा 

सदैव करती तुझाच धावा 

आलो तुझ्या दर्शनाला...


आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


वाट पाहुनी थकले डोळे 

वाट पाहुनी थकले डोळे 

उत्तर दे तु अमुच्या हाकेला

आलो तुझ्या दर्शनाला...


आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


आलो तुझ्या दर्शनाला (३)


तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.

माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो.

मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.

आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हांला ठाऊक आहे.”

थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”

येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते.

जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे.”

फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.

येशूने त्याला म्हटले, “फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग ‘आम्हांला पिता दाखव’ असे तू कसे म्हणतोस?

मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या माझ्या स्वत:च्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वत: कामे करतो.

मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.

मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो.

आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.

जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन.”

“जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल.

आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हांला दुसरा साहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्वकाळ राहावे.

साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील.

“मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन.

आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल.

त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे.

ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वत:ला त्याच्यासाठी प्रगट करीन.”

मग यहूदा  त्याला म्हणाला, “पण प्रभु, तू आम्हांसमोर स्वत:ला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?”

येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्चावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू.

जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”

“मी तुम्हांजवळ राहत असतानाच तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत.

तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.

“शांति मी तुमच्याजवळे ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंत:करणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका.

'मी जोते आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे.

मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.

मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही.

परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीति करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो. “चला आता, आपण निघू या.”


हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया

सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती






सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती
वल्हव रे माझी नाव ने किनारी (२)


सुटला वारा जीवनाच्या सागरी
आदळली रे नाव खडकावरी (२)

तुजविना रे कोण आम्हा तारी
तुजविना रे कोण आम्ही तारी
वल्हव रे माझी नाव ने किनारी 


सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती
वल्हव रे माझी नाव ने किनारी (२)


वादळ वार्यात प्रभू तुझा आधार
तुजविना कोण आम्हा तारणार (२)


आरोळी माझी पोहचो तुझ्या दारी 
आरोळी माझी पोहचो तुझ्या दारी 
वल्हव रे माझी नाव ने किनारी 


सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती
वल्हव रे माझी नाव ने किनारी (२)


अथांग सागर तुफान लाटावरी
दृष्टी असो तुझी प्रभू आम्हावरी (२)


तुजविना रे कोण आम्हा कैवारी
तुजविना रे कोण आम्हा कैवारी 
वल्हव रे माझी नाव ने किनारी 


सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती
वल्हव रे माझी नाव ने किनारी (२)


दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर होते.
त्याने बोधकथेवरून पुष्कळ गोष्टी शिकविल्या. शिक्षण देताना तो म्हणाला,
“ऐका! एक शेतकरी आपले बी पेरावयास गेला.
तो पेरीत असता काही वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले.
दुसरे काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फार माती नव्हाती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले पण
सूर्य उगवल्यावर ते करपले आणि मूळ रूजले नसल्यामुळे ते वाळून गेले.
काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडपे अधिक वाढली आणी त्यांनी त्याची वाढ खुंटविली. व त्याला पीक आले नाही
पण काही बी चांगल्या जमीनीवर पडले, ते उगवले, वाढले आणि भरपूर पीक आले आणि त्याचे कोठे तीसपट, कोठे साठपट आणि कोठे शंभरपट पीक आले.”
मग तो म्हणाला, “ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!”
जेव्हा तो एकटा होता तेव्हा त्याच्याभोवती बारा शिष्यांसह जे इतर होते त्यांनी त्या बोधकथांविषयी त्याला विचारले.
तो त्यास म्हणाला, “केवळ तुम्हांस देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे (अधिकार) देण्यात आले आहेत, पण बाहेराच्यांना गोष्टीरूपात सांगितले आहे.
यासाठी की, ‘ते पाहत असता पाहतील पण त्यांना कधीच दिसणार नाही ते ऐकत असता ऐकतील पण त्यांना कधीच समजणार नाही जर त्यांनी पाहिले आणि त्यांना समजले तर त्यांच्यात कदाचित बदल होईल आणि त्यांना क्षमा करण्यात येईल.”‘
मग तो त्यांस म्हणाला, “तुम्हांला ही बोधकथा समजत नाही काय? तर मग तुम्हांला दुसरी कोणतीही गोष्ट कशी समजेल?
पेरणारा वचन पेरतो.
काही लोक वाटेवर पेरलेल्या बियांसारखे जेथे वचन पेरले आहे अशासारखे आहेत. जेव्हा ते ऐकतात तेव्हा लगेच सैतान येतो आणि त्यांच्यात पेरलेले वचन घेऊन जातो.
काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात.
पण त्यांनी त वचन आपल्यामध्ये खोलवर रूजू न दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकटे येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात.
इतर लोक काटेरी झुडपात बी पेरल्याप्रमाणे आहेत. ते असे आहेत की, जे वचन ऐकतात.
परंतु या संसाराच्या चिंता, संपत्तीचा मोह, आणि इतर गोष्टींची इच्छा या गोष्टी आड येतात, व वचन खुंटवितात व ते फळ देत नाहीत.
आणि इतर दुसरे चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियांसारखे आहेत. ते असे आहेत की जे वचन ऐकतात, स्वीकारतात, आणि फळ देतात. कोणी तीसपट. साठपट, कोणी शंभरपट.”
आणखी तो त्यांस म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली कधी ठेवतात काय? तो दिवठणीवर ठेवण्यासाठी आणीत नाहीत काय?
प्रत्येक गोष्ट जी झाकलेली आहे ती उघड होईल. आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल.
ज्याला कान आहेत ते ऐको!
नंतर तो त्यास म्हणाला, “तुम्ही जे ऐकता त्याचा काळजीपूर्वक विचार करा. जे माप तुम्ही इतरांसाठी वापरता त्याच मापाने तुमच्यासाठी मोजण्यात जेईल. किंबहूना थोडे जास्तच तुम्हांला देण्यात येईल.
कारण ज्याच्याजवळ आहे त्याला जास्त दिले जाईल आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.”
आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, एखादा मनुष्य जमिनीवर बी पसरून टाकतो.
रात्री झोपतो आणि दिवसा उठतो. बी रूजते व ते वाढते हे कसे होते हे त्याला कळत नाही.
जमीन आपोआप पीक उपजवते. प्रथम अंकुर, नंतर तुरा, त्यानंतर दाण्यांनी भरलेले ओंबी, मग कणसात पर्ण वाढलेला दाणा.
पीक तयार होते तेव्हा तो त्याला लगेच विळा लावतो. कारण कापणीची वेळ आलेली असते.”
येशू म्हणाला, “आपण देवाचे राज्य कशासारखे आहे असे म्हणावे किंवा कोणती गोष्ट ते समजावून सांगाण्यासाठी उपयोगात आणावी?
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असतो.
परंतु तो पेरला जातो तेव्हा तो वाढतो व मळ्यातील सर्व झाडात मोठा होतो. त्याला मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात.”
अशा अनेक बोधकथांनी त्याने ते समजू शकतील असा संदेश त्यांना सांगितला.
बोधकथेचा उपयोग केल्याशिवाय त्याने त्यांना इतर काहीही सांगितले नाही, परंतु जेव्हा तो शिष्यांसह एकांतात होता तेव्हा त्याने शिष्यांना सर्व समजावून सांगितले.
त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवरापलीकडे जाऊ या.”
मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो नावेत होता तसेच त्याला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसऱ्या नावा होत्या.
जोराच्या वाऱ्याचे वादळ आले आणि लाटा नावेवर आदळू लागल्या व ती पाण्याने भरू लागली.
परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशी घेऊन झोपला होता. त्यांनी त्याला उठविले आणि म्हटले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणांस काळजी वाटत नाही काय?”
मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजुनही कसा विश्वास नाही?”
परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, की वारा आणि समुद्रदेखील त्याचे ऐकतात.”
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया...

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

प्रभू ये सखया ये मम हृदयी






प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 


जीवन ज्योती तुची प्रभू 
प्रिती मम जीवनाची (२)
वन उपवनी प्रभू श्वास तुझे रे (२)
श्वास तुझे रे (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 


पाप तिमीर घनदाट जगी
माणुसकी दुर्मिळ (२)
दिपस्तंभ प्रभू होऊनी ये तु (२)
होऊनी ये तु (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 

वेशाचे तट तोड प्रभू 
माणुस कर माणसा (२)
प्रितीने जग फुलव प्रभू तु (२)
फुलव प्रभू तु (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 

संपत्तीची आस मनी
नाती तुटती जगी (२)
जीवन धन प्रभू होऊनी ये तु (२)
होऊनी ये तु (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 

आशा आमुची तुची प्रभू 
मुक्ति या जीवनाची (२)
शाश्वत भाकर होऊनी ये तु (२)
होऊनी ये तु (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी (३)


येशू जैतुनाच्या डोंगरावरनिघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले.
नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी एका स्त्रीला घेऊन तेथे आले. त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते. या यहूदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले.
ते येशूला म्हणाले ‘गुरूजी, जो हिचा नवरा नाही, अशा माणसाशी व्यभिचार करताना ह्या स्त्रीला पकडले.
मोशेच्या नियमशस्त्रात अशी आज्ञा दिलेली आहे की, असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करुन जिवे मारले पाहिजे. आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?”
येशूला पेचात पकडावे म्हणून यहूदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काही तरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला.
हूदी पुढारी येशूला प्रश्न विचारीतच राहिले, म्हणून येशू मान वर करुन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, “ज्याने कधीच पाप केले नाही असा एकतरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो.”
मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला.
येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले, ते एक एक करुन निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले. मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती त्याच्यासमोर उभी होती.
येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, “बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?”
त्या स्त्रीने उत्तर दिले. “महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही.” मग येशू म्हणाला, “मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करु नकोस.”
नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील.”
परंतु परुशी लोक येशूला म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्वत: आपल्याविषयी बोलता, तेव्हा ह्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारु शकत नाही.”
येशूने उत्तर दिले, “होय, मी स्वत:च माझ्याविषयी हा गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील. कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हांला माहीत नाही.
तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही.
पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो. कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले, तो माझ्याबरोबर असतो.
तुमचे स्वत:चेच नियमशास्त्र असे म्हणते की, दोन साक्षीदार एकाच गोष्टीविषयी साक्ष देतात तेव्हा ते काय म्हणतात, ते तुम्हांला स्वीकारावेच लागते.
स्वत:विषयी बोलणाऱ्या दोघा साक्षीदारांपैकी मी एक साक्षीदार आहे. आणि ज्या पित्याने मला पाठविले, तो दुसरा साक्षीदार आहे.”
लोकांनी येशूला विचारले, “तुमचा पिता कोठे आहे.?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला अगर माझ्या पित्याला ओळखत नाही. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
येशू मांदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला. ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटीजवळच तो होता. परंतु येशूला कोणी अटक केली नाही. कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.
येशू पुन्हा लोकांना म्हणाला, “मी लवकरच तुम्हांला सोडून जाईन. तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही आपल्या पापात मराल. मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”
म्हणून यहूदी लोक एकमेकांस विचारु लागले. “येशू स्वत:ला ठार करणार नाही ना? यासाठी तो असे म्हणाला का, ‘की मी जाणार आहे, तिकडे तुम्ही येऊ शकणार नाही?’
पण येशू म्हणाला, “तुम्ही लोक येथील खालचे आहात. पण मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहा; परंतु मी या जगाचा नाही.
तुम्ही आपल्या पापात मराल असे मी म्हणालो, होय. ‘मी आहे’यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर तुम्ही पापात मराल.”
यहूदी लोकांनी विचारले. “मग तुम्ही कोण आहात?” येशूने उत्तर दिले, “मी सुरुवातीपासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे.
तुमच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. मी तुमचा न्याय करु शकतो. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो. आणि तो सत्य सांगतो.”
येशू कोणाविषयी बोलत आहे, हे लोकांना समजेना. येशू त्यांन पित्याविषयी सांगत होता.
म्हणून येशू लोकांना म्हणाला. “तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वत:च्या अधिकारात करीत नाही, हे तुम्हांला समजेल. तुम्हांला समजेल की, ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो.
ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो. म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही.”
येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्या यहूदी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल, तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात.
मग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आणि सत्य तुम्हांला मोकळे करील.”
यहूदी लोकांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो तर आम्ही मोकळे होऊ असे तुम्ही का म्हणता?”
येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे.
गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही. परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो.
म्हणून जर पुत्र तुमजी सुटका करतो, तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल.
तुम्ही अब्राहामाचे लोक आहात हे मला माहीत आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारावयास टपलेले आहात. कारण तुम्हांला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे.
माझ्या पित्याने जे काही मला दाखवून दिले, तेच मी तुम्हांला सांगत आहे. परंतु तुमच्या पित्याने तुम्हांला सांगितले तेच तुम्ही करता.”
यहूदी लोकांनी उत्तर दिले. “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच अब्राहामाची संतति असता तर अब्राहामाने केल्या त्याच गोष्टी तुम्ही केल्या असत्या.
देवाकडून जे सत्य ऐकले ते तुम्हांला सांगणारा मी एक मनुष्य आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारायला पाहता. अब्राहामाने तसे केले नाही.
पण अब्राहामाने जे केले नाही ते तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत तर तुमचा पिता अब्राहाम नसून कोणी वेगळा आहे.” परंतु यहूदी म्हणाले, “ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही! देव आमचा पिता आहे. तोच एक आमचा पिता आहे.”
येशू त्या यहूदी लोकांना म्हणाला, “जर देव खरोखरच तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती. मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे. मी माझ्या स्वत:च्या अधिकारात आलो नाही. देवानेच मला पाठिले.
मी म्हणतो, मी देत असलेली शिकवण तुम्हांला समजत नाही का? कारण की तुम्हांला माझी शिकवण स्वीकारता येत नाही.
तुमचा पिता सैतान आहे. तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुनातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरूद्ध आहे. आणि सैतानाच्या ठायी सत्य नाही. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे. सैतान लबाड आहे. आणि तो असत्याचा पिता आहे.
मी सत्य बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही.
मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करु शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही?
जो देवाचा आहे, तो देवाचे म्हणणे ऐकतो. परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. कारण तुम्ही देवाचे लोक नाहीत.”
यहूदी म्हणाले, “तुम्ही शोमरोनी आहात, तुम्हांला भूताने पछाडले आहे, असे आम्ही म्हणालो तर आम्ही म्हणतो तेच बरोबर नाही काय?”
येशूने उत्तर दिले. “मला भूत लागले नाही, मी तर आपल्या पित्याचा मान राखतो. परंतु तुम्ही माझा मान राखीत नाही.
स्वत:ला सन्मान मिळविण्याचा प्रयत्न मी करीत नाही. माझा सन्मान व्हावा असे एकाला देवाला वाटते. तोच न्यायाधीश आहे.
मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही.
यहूदी लोक म्हणाले, “तुमच्यात खरोखर भूत संचारले आहे. हे आता आम्हांला माहीत झाले. अब्राहाम आणि संदेष्टे मेले. परंतु तुम्ही म्हणता, ‘जो माझ्या शिकवणूकीचे पालन करतो तो कधीच मरणार नाही.’
तुम्ही आमचा पिता अब्राहाम याच्यापेक्षाही थोर आहात असे तुम्हांला वाटते काय? अब्राहाम मेला, तसेच संदेष्टेही मेले. तुम्ही स्वत:ला समजता तरी कोण?”
येशूने उत्तर दिले, “जर मी स्वत:च स्वत:चा सन्मान केला तर त्या सन्मानाला काहीच अर्थ नाही. माझा पिता माझा सन्मान करतो. तो आमचा देव आहे असे तुम्ही म्हणता.
 परंतु तुम्ही खरोखर त्याला ओळखीत नाही. पण मी त्याला ओळखतो. तो सांगतो त्याचे पालन मी करतो. मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणालो, तर तुम्ही लबाड आहात तसा मीही लबाड ठरेन. परंतु मी त्याला नक्कीच ओळखतो. आणि तो जे काही सांगतो त्याचे पालन करतो.
माझ्या येण्याचा दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहाम आनंदित झाला होता. त्याने तो दिवास पाहिला आणि त्याला आनंद झाला.”
यहूदी लोक येशूला म्हणाले. “तुम्ही अब्राहामाला कधीच पाहिले नाही. तुम्ही पन्नास वर्षांचेही नाही!”
येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: अब्राहामाच्या जन्मापूर्वि पासून मी आहे.”
जेन्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले. पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला.
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया...

देवाचा महिमा वर्णावा








देवाचा महिमा वर्णावा
गौरव त्याचा करावा 
धन्यवाद देवाला द्यावा 
धन्यवाद देवाला द्यावा (२)


पापांची आम्हाला क्षमा करितो
करुणा कृपेची वृष्टी करितो (२)


सन्मार्गावरी आम्हाला चालवितो (२)
देवाचा अनुभव घ्यावा

धन्यवाद देवाला द्यावा

धन्यवाद देवाला द्यावा

देवाचा महिमा वर्णावा
गौरव त्याचा करावा 
धन्यवाद देवाला द्यावा 
धन्यवाद देवाला द्यावा (१)


रोज पहाटे आम्हाला जागवितो
कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो (२)


दिवसरात्र आम्हाला जपतो (२)
देवाचा अनुभव घ्यावा
धन्यवाद देवाला द्यावा
धन्यवाद देवाला द्यावा


देवाचा महिमा वर्णावा
गौरव त्याचा करावा 
धन्यवाद देवाला द्यावा 
धन्यवाद देवाला द्यावा (१)


उत्तम भाकर आम्हाला पुरवितो
जीवनाचे जल आम्हाला पाजवितो (२)


उत्तम आरोग्य आम्हाला देतो (२)
देवाचा अनुभव घ्यावा
धन्यवाद देवाला द्यावा
धन्यवाद देवाला द्यावा


देवाचा महिमा वर्णावा
गौरव त्याचा करावा 
धन्यवाद देवाला द्यावा 
धन्यवाद देवाला द्यावा (२)


स्वर्ग देवाचा महिमा गातात. आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही. तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात. आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो. सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या एखाद्या धावपटू सारखी करतो.
सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो. त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही. परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे. ती देवाच्या लोकांना शक्ती देते. परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे. त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्राच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
परमेश्वराची भीती शुध्द आहे. ती अखंड सहन करावी लागेल. परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत. ते संपूर्णत बरोबर आहेत.
परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे. ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
परमेश्वराच्या शिकवणी नेत्याच्या सेवकाला इशारा दिला. चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत. म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस. त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस. तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईनआणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचांरांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया...

रविवार, ३१ मे, २०२०

हा दिवस प्रभूचा आहे







Lyrics :- हा दिवस प्रभूचा आहे


हा दिवस प्रभूचा आहे
उल्हास व आनंद करू...(२)

किती थोर तो देव
सर्वस्व आपणांस दिले...(२)

तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे...(२)

हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना...(२)

हाल्लेलुया... हाल्लेलुया...
हाल्लेलुया...(२)

चला हो आता त्याकडे
महिमा स्तुती वर्णू...(२)

स्वर्गाच्या देवाला
स्तुतीचे गीत गाऊ...(२)

तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे...(२)

हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना...(२)

हाल्लेलुया... हाल्लेलुया...
हाल्लेलुया...(२)

त्याचा अनुभव घ्या
किती तो चांगला आहे...(२)

सैतानी बंधनातूनी
आपणांस सोडवितो...(२)

तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे...(२)

हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना...(२)

हाल्लेलुया... हाल्लेलुया...
हाल्लेलुया...(२)


हा प्रभूचा दिवस आहे उल्हास व आनंद करा
पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले. 
देवाने आपण करीत असलेले काम संपवले म्हणून सातव्या दिवशी त्याने काम करण्यापासून विसावा घेतला. 
देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला. 
हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे. 
त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते. कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. 
पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. 
नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला. 
मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. 
परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली. 
एदेन बागेत एक नदी उगम पावली व तिने सर्व बागेला पाणी पुरवले. नंतर ती नदी विभागून तिच्या चार वेगळया नद्या झाल्या. 
पहिल्या नदिचे नाव पीशोन होते. ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते 
 त्या देशात चांगल्या प्रतीचे सोने सांपडते. तेथे मोती व गोमेद ही रत्ने सापडतात 
दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे, ही सगळ्या कूश म्हणजे इथिओपिया देशाभोवती वाहते. 
तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल. ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते. चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे. 
परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. 
परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली; परमेश्वर म्हणाला, "बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो. 
परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील." 
नंतर परमेश्वर बोलला, "मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन." 
परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली. 
आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील, रानावनातील जनावरे यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू - पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही. 
तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली. 
परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. 
तेव्हा आदाम म्हणाला,"आता ही मात्र माझ्यासारखी आहे. तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे. मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो. कारण ती नरापासून बनवलेली आहे." 
म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील. 
एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती. परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवाचे आभार मानुया...


राजा येशू आला




Lyrics :- राजा येशू आला

 

राजा येशू आला...(४)


सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

घालवूनी पापे
आणि दुःखे घोर...(२)

पुर्ण शांती द्यावयाला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

आनंदी आनंद
झालो पापमुक्त...(२)

मला शुद्ध करायाला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

वधस्तंभावरी
प्राण देता झाला...(२)

जगताचा त्राता झाला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

राजांचा तो राजा
प्रभूंचा तो प्रभू...(२)

बोला सारे जय जय बोला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(४)


दुसऱ्यांदा येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्या होता.
येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते.
येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “लोकांच्या समोर उभा राहा.”
नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जिवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” परंतु ते गप्प रहीले.
येशूने सर्वांकडे रागाने पाहिले. त्यांच्या मनाच्या कठीणतमुळे तोे फार खिन्न झाला. तो त्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर,” त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला.
नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबरयेशूविरूद्ध कट करू लागले.
येशू आपल्या शिष्यांसह गालील सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीयातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला.
कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व यरुशलेम, इदूमिया, यार्देनेच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सीदोनच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशूकडे आला.
मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांस एक छोठी होडी आणावयास सांगितली,
त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पूढे रेटीत होते.
जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”
पण त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की, मला प्रगट करू नका.
नंतर येशू डोंगरावर गेला आणि जे त्याला पाहिजे होते त्यांना त्याने स्वत:कडे बोलाविल. व ते त्याच्याकडे आले.
त्याने बारा जण निवडले व त्यांना प्रेषीत हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठविता यावे.
व त्यांना भुते काढण्याचा अधिकार असावा.
मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्याला पेत्र हे नाव दिले.
जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांना त्याने बेनेरेगेश, ज्याचा अर्थ ‘गर्जनेचे पुत्र’ असा होतो हे नाव दिले.
अंद्रिया, फिलीप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी
आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.
नंतर येशू घरी गेला आणि पुन्हा एकदा एवढा मोठा लोकसमुदाय जमला की, येशू व त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत.
त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणावयास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे.
यरूशलेमेहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, “याच्यामध्ये बालजबूल आहे.” आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भुतांना घालवून देतो.”
मग य़ेशूने त्यांना जवळ बोलाविले व बोधकथेच्या साहाय्याने त्याच्याशी बोलू लागला, “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल?
जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही.
आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही.
तर मग सैतान स्वत:लाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही. परंतु त्याचा शेवट होईल.
खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मिळकत लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान माणसाला बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.
मी तुम्हांस खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.
पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.
येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे.
नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले. ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलवावायास पाठविले.
लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, “पाहा तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.”
त्याने त्यांना उत्तर दिले. “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?”
येशूने जे त्याच्याभोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पाहा माझी आई आणि माझे भाऊ.”
जे जे कोणी देवाच्या इच्छेाप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई आहेत.”

धन्यवाद येशूला




                                 Lyrics :- धन्यवाद येशूला


धन्यवाद येशूला...(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
धन्यवाद येशूला...(२)

महिमा हो द्या त्याला...(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
महिमा हो द्या त्याला...(२)

गौरव द्या त्याला...(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
गौरव द्या त्याला...(२)

धन्यवाद येशूला...(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
धन्यवाद येशूला...(२)

ख्रिस्त माझा तारणारा
मला वाटे प्रिय फार...(२)

ज्या ज्या वेळी ,होते दुःख
करिता धावा देतो सुख...(२)

ख्रिस्त माझा तारणारा
मला वाटे प्रिय फार...(२)

काय सांगू त्याचे प्रेम
देतो वारंवार क्षेम...(२)

ख्रिस्त माझा तारणारा
मला वाटे प्रिय फार...(२)

मला वाटे प्रिय फार...(२)


परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
इस्राएल, म्हण “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.
परमेश्वर मला मदत करणारा आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.
परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.
शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.
परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.
चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
परमेश्वराने मला शिक्षा केली परंतु त्याने मला मरु दिले नाही.
चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.
हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला.
परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा. “याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.”
परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो. बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.
परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया...

Featured Post

आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) मंदिर तुझे सुंदर पावन मंदिर तुझे सुंदर पावन  मनात अमुच्या तुझेच चिंतन  आलो तुझ्या दर्शनाला....

Popular Posts