Lyrics :- देवाच्या भेटीसाठी
देवाच्या भेटीसाठी
मी तळमळतो अंतरी
अपार तळमळतो अंतरी...॥२॥
देवाच्या भेटीसाठी...
तृषित हरिणी जशी तळमळे
पाण्याच्या ओघासाठी
तसाच माझा जीव तळमळे
देवा तव भेटीसाठी
देवाच्या भेटीसाठी
मी तळमळतो अंतरी
अपार तळमळतो अंतरी
देवाच्या भेटीसाठी
माझा जीव देवासाठी
पहा किती हा तान्हेला
दर्शन देवाचे मज केव्हा
घडेल ऐसे होई मला
देवाच्या भेटीसाठी
मी तळमळतो अंतरी
अपार तळमळतो अंतरी
देवाच्या भेटीसाठी
मना खिन्नता तू झालासी
कशास ऐसा तळमळशी
सोडू नको रे धीर मना तू
देईल दर्शन तो तुजसी
देवाच्या भेटीसाठी
मी तळमळतो अंतरी
अपार तळमळतो अंतरी
देवाच्या भेटीसाठी
देव परात्पर करील दिवसा
अपुल्या वात्सल्या प्रकट
जीवन दात्या माझ्या प्रभू चे
रात्री गाईन मी गित
देवाच्या भेटीसाठी
मी तळमळतो अंतरी
अपार तळमळतो अंतरी
देवाच्या भेटीसाठी
विसरलास तो मजला ऐसे
विचारीन मी देवाला
वैर्याच्याजाचा मी पिढलो
शोकवस्र हे अंगाला
देवाच्या भेटीसाठी
मी तळमळतो अंतरी
अपार तळमळतो अंतरी
देवाच्या भेटीसाठी
कोठे तुझा आहे देव
असे मला शत्रू म्हणती
निंदा माझी सदा करिती
हृदया माझ्या दुःखविती
देवाच्या भेटीसाठी
मी तळमळतो अंतरी
अपार तळमळतो अंतरी
देवाच्या भेटीसाठी
स्तवन करूया परमपित्याचे
परमपुत्राचे वारंवार
पवित्र आत्म्याचे गुणगायन
मुखे करूया जयजयकार
देवाच्या भेटीसाठी
मी तळमळतो अंतरी
अपार तळमळतो अंतरी...॥३॥
Leslie Stephen Miranda
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा