VASAI CATHOLIC CHURCH SONGS

Vasai Catholic Church Songs Lyrics Available This Site

VASAI CATHOLIC CHURCH SONGS लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
VASAI CATHOLIC CHURCH SONGS लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

आलो तुझ्या दर्शनाला देवा






आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


मंदिर तुझे सुंदर पावन

मंदिर तुझे सुंदर पावन 

मनात अमुच्या तुझेच चिंतन 

आलो तुझ्या दर्शनाला...


आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


चरण पाहता तुझेच देवा 

चरण पाहता तुझेच देवा 

येई अर्थ अमुच्या जगण्याला

आलो तुझ्या दर्शनाला...


आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


सुमधूर सूर हे अमुचे देवा 

सुमधूर सूर हे अमुचे देवा 

सदैव करती तुझाच धावा 

आलो तुझ्या दर्शनाला...


आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


वाट पाहुनी थकले डोळे 

वाट पाहुनी थकले डोळे 

उत्तर दे तु अमुच्या हाकेला

आलो तुझ्या दर्शनाला...


आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला (२)


आलो तुझ्या दर्शनाला (३)


तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.

माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो.

मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.

आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हांला ठाऊक आहे.”

थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”

येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते.

जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे.”

फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.

येशूने त्याला म्हटले, “फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग ‘आम्हांला पिता दाखव’ असे तू कसे म्हणतोस?

मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या माझ्या स्वत:च्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वत: कामे करतो.

मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.

मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो.

आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.

जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन.”

“जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल.

आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हांला दुसरा साहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्वकाळ राहावे.

साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील.

“मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन.

आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल.

त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे.

ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वत:ला त्याच्यासाठी प्रगट करीन.”

मग यहूदा  त्याला म्हणाला, “पण प्रभु, तू आम्हांसमोर स्वत:ला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?”

येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्चावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू.

जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”

“मी तुम्हांजवळ राहत असतानाच तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत.

तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.

“शांति मी तुमच्याजवळे ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंत:करणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका.

'मी जोते आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे.

मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.

मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही.

परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीति करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो. “चला आता, आपण निघू या.”


हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया

सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती






सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती
वल्हव रे माझी नाव ने किनारी (२)


सुटला वारा जीवनाच्या सागरी
आदळली रे नाव खडकावरी (२)

तुजविना रे कोण आम्हा तारी
तुजविना रे कोण आम्ही तारी
वल्हव रे माझी नाव ने किनारी 


सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती
वल्हव रे माझी नाव ने किनारी (२)


वादळ वार्यात प्रभू तुझा आधार
तुजविना कोण आम्हा तारणार (२)


आरोळी माझी पोहचो तुझ्या दारी 
आरोळी माझी पोहचो तुझ्या दारी 
वल्हव रे माझी नाव ने किनारी 


सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती
वल्हव रे माझी नाव ने किनारी (२)


अथांग सागर तुफान लाटावरी
दृष्टी असो तुझी प्रभू आम्हावरी (२)


तुजविना रे कोण आम्हा कैवारी
तुजविना रे कोण आम्हा कैवारी 
वल्हव रे माझी नाव ने किनारी 


सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती
वल्हव रे माझी नाव ने किनारी (२)


दुसऱ्या वेळी येशू सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले. मग तो सरोवरातील नावेत बसला आणि सर्व लोक सरोवराच्या किनाऱ्यावरील जमिनीवर होते.
त्याने बोधकथेवरून पुष्कळ गोष्टी शिकविल्या. शिक्षण देताना तो म्हणाला,
“ऐका! एक शेतकरी आपले बी पेरावयास गेला.
तो पेरीत असता काही वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले.
दुसरे काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फार माती नव्हाती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले पण
सूर्य उगवल्यावर ते करपले आणि मूळ रूजले नसल्यामुळे ते वाळून गेले.
काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडपे अधिक वाढली आणी त्यांनी त्याची वाढ खुंटविली. व त्याला पीक आले नाही
पण काही बी चांगल्या जमीनीवर पडले, ते उगवले, वाढले आणि भरपूर पीक आले आणि त्याचे कोठे तीसपट, कोठे साठपट आणि कोठे शंभरपट पीक आले.”
मग तो म्हणाला, “ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!”
जेव्हा तो एकटा होता तेव्हा त्याच्याभोवती बारा शिष्यांसह जे इतर होते त्यांनी त्या बोधकथांविषयी त्याला विचारले.
तो त्यास म्हणाला, “केवळ तुम्हांस देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे (अधिकार) देण्यात आले आहेत, पण बाहेराच्यांना गोष्टीरूपात सांगितले आहे.
यासाठी की, ‘ते पाहत असता पाहतील पण त्यांना कधीच दिसणार नाही ते ऐकत असता ऐकतील पण त्यांना कधीच समजणार नाही जर त्यांनी पाहिले आणि त्यांना समजले तर त्यांच्यात कदाचित बदल होईल आणि त्यांना क्षमा करण्यात येईल.”‘
मग तो त्यांस म्हणाला, “तुम्हांला ही बोधकथा समजत नाही काय? तर मग तुम्हांला दुसरी कोणतीही गोष्ट कशी समजेल?
पेरणारा वचन पेरतो.
काही लोक वाटेवर पेरलेल्या बियांसारखे जेथे वचन पेरले आहे अशासारखे आहेत. जेव्हा ते ऐकतात तेव्हा लगेच सैतान येतो आणि त्यांच्यात पेरलेले वचन घेऊन जातो.
काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात.
पण त्यांनी त वचन आपल्यामध्ये खोलवर रूजू न दिल्यामुळे ते थोडाच काळ टिकतात. जेव्हा वचनामुळे संकटे येतात किंवा त्रास होतो तेव्हा ते चटकन विश्वास ठेवण्याचे सोडून देतात.
इतर लोक काटेरी झुडपात बी पेरल्याप्रमाणे आहेत. ते असे आहेत की, जे वचन ऐकतात.
परंतु या संसाराच्या चिंता, संपत्तीचा मोह, आणि इतर गोष्टींची इच्छा या गोष्टी आड येतात, व वचन खुंटवितात व ते फळ देत नाहीत.
आणि इतर दुसरे चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियांसारखे आहेत. ते असे आहेत की जे वचन ऐकतात, स्वीकारतात, आणि फळ देतात. कोणी तीसपट. साठपट, कोणी शंभरपट.”
आणखी तो त्यांस म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली कधी ठेवतात काय? तो दिवठणीवर ठेवण्यासाठी आणीत नाहीत काय?
प्रत्येक गोष्ट जी झाकलेली आहे ती उघड होईल. आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल.
ज्याला कान आहेत ते ऐको!
नंतर तो त्यास म्हणाला, “तुम्ही जे ऐकता त्याचा काळजीपूर्वक विचार करा. जे माप तुम्ही इतरांसाठी वापरता त्याच मापाने तुमच्यासाठी मोजण्यात जेईल. किंबहूना थोडे जास्तच तुम्हांला देण्यात येईल.
कारण ज्याच्याजवळ आहे त्याला जास्त दिले जाईल आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.”
आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, एखादा मनुष्य जमिनीवर बी पसरून टाकतो.
रात्री झोपतो आणि दिवसा उठतो. बी रूजते व ते वाढते हे कसे होते हे त्याला कळत नाही.
जमीन आपोआप पीक उपजवते. प्रथम अंकुर, नंतर तुरा, त्यानंतर दाण्यांनी भरलेले ओंबी, मग कणसात पर्ण वाढलेला दाणा.
पीक तयार होते तेव्हा तो त्याला लगेच विळा लावतो. कारण कापणीची वेळ आलेली असते.”
येशू म्हणाला, “आपण देवाचे राज्य कशासारखे आहे असे म्हणावे किंवा कोणती गोष्ट ते समजावून सांगाण्यासाठी उपयोगात आणावी?
ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असतो.
परंतु तो पेरला जातो तेव्हा तो वाढतो व मळ्यातील सर्व झाडात मोठा होतो. त्याला मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात.”
अशा अनेक बोधकथांनी त्याने ते समजू शकतील असा संदेश त्यांना सांगितला.
बोधकथेचा उपयोग केल्याशिवाय त्याने त्यांना इतर काहीही सांगितले नाही, परंतु जेव्हा तो शिष्यांसह एकांतात होता तेव्हा त्याने शिष्यांना सर्व समजावून सांगितले.
त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवरापलीकडे जाऊ या.”
मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो नावेत होता तसेच त्याला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसऱ्या नावा होत्या.
जोराच्या वाऱ्याचे वादळ आले आणि लाटा नावेवर आदळू लागल्या व ती पाण्याने भरू लागली.
परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशी घेऊन झोपला होता. त्यांनी त्याला उठविले आणि म्हटले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणांस काळजी वाटत नाही काय?”
मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजुनही कसा विश्वास नाही?”
परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, की वारा आणि समुद्रदेखील त्याचे ऐकतात.”
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया...

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

प्रभू ये सखया ये मम हृदयी






प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 


जीवन ज्योती तुची प्रभू 
प्रिती मम जीवनाची (२)
वन उपवनी प्रभू श्वास तुझे रे (२)
श्वास तुझे रे (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 


पाप तिमीर घनदाट जगी
माणुसकी दुर्मिळ (२)
दिपस्तंभ प्रभू होऊनी ये तु (२)
होऊनी ये तु (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 

वेशाचे तट तोड प्रभू 
माणुस कर माणसा (२)
प्रितीने जग फुलव प्रभू तु (२)
फुलव प्रभू तु (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 

संपत्तीची आस मनी
नाती तुटती जगी (२)
जीवन धन प्रभू होऊनी ये तु (२)
होऊनी ये तु (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी 

आशा आमुची तुची प्रभू 
मुक्ति या जीवनाची (२)
शाश्वत भाकर होऊनी ये तु (२)
होऊनी ये तु (२)

प्रभू ये सखया ये मम हृदयी (२)
व्याकुळले मन माझे
ये या जीवनी
प्रभू ये सखया ये मम हृदयी (३)


येशू जैतुनाच्या डोंगरावरनिघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले.
नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी एका स्त्रीला घेऊन तेथे आले. त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते. या यहूदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले.
ते येशूला म्हणाले ‘गुरूजी, जो हिचा नवरा नाही, अशा माणसाशी व्यभिचार करताना ह्या स्त्रीला पकडले.
मोशेच्या नियमशस्त्रात अशी आज्ञा दिलेली आहे की, असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करुन जिवे मारले पाहिजे. आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?”
येशूला पेचात पकडावे म्हणून यहूदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काही तरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला.
हूदी पुढारी येशूला प्रश्न विचारीतच राहिले, म्हणून येशू मान वर करुन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, “ज्याने कधीच पाप केले नाही असा एकतरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो.”
मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला.
येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले, ते एक एक करुन निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले. मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती त्याच्यासमोर उभी होती.
येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, “बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?”
त्या स्त्रीने उत्तर दिले. “महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही.” मग येशू म्हणाला, “मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करु नकोस.”
नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील.”
परंतु परुशी लोक येशूला म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्वत: आपल्याविषयी बोलता, तेव्हा ह्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारु शकत नाही.”
येशूने उत्तर दिले, “होय, मी स्वत:च माझ्याविषयी हा गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील. कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हांला माहीत नाही.
तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही.
पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो. कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले, तो माझ्याबरोबर असतो.
तुमचे स्वत:चेच नियमशास्त्र असे म्हणते की, दोन साक्षीदार एकाच गोष्टीविषयी साक्ष देतात तेव्हा ते काय म्हणतात, ते तुम्हांला स्वीकारावेच लागते.
स्वत:विषयी बोलणाऱ्या दोघा साक्षीदारांपैकी मी एक साक्षीदार आहे. आणि ज्या पित्याने मला पाठविले, तो दुसरा साक्षीदार आहे.”
लोकांनी येशूला विचारले, “तुमचा पिता कोठे आहे.?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला अगर माझ्या पित्याला ओळखत नाही. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
येशू मांदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला. ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटीजवळच तो होता. परंतु येशूला कोणी अटक केली नाही. कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.
येशू पुन्हा लोकांना म्हणाला, “मी लवकरच तुम्हांला सोडून जाईन. तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही आपल्या पापात मराल. मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”
म्हणून यहूदी लोक एकमेकांस विचारु लागले. “येशू स्वत:ला ठार करणार नाही ना? यासाठी तो असे म्हणाला का, ‘की मी जाणार आहे, तिकडे तुम्ही येऊ शकणार नाही?’
पण येशू म्हणाला, “तुम्ही लोक येथील खालचे आहात. पण मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहा; परंतु मी या जगाचा नाही.
तुम्ही आपल्या पापात मराल असे मी म्हणालो, होय. ‘मी आहे’यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर तुम्ही पापात मराल.”
यहूदी लोकांनी विचारले. “मग तुम्ही कोण आहात?” येशूने उत्तर दिले, “मी सुरुवातीपासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे.
तुमच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. मी तुमचा न्याय करु शकतो. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो. आणि तो सत्य सांगतो.”
येशू कोणाविषयी बोलत आहे, हे लोकांना समजेना. येशू त्यांन पित्याविषयी सांगत होता.
म्हणून येशू लोकांना म्हणाला. “तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वत:च्या अधिकारात करीत नाही, हे तुम्हांला समजेल. तुम्हांला समजेल की, ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो.
ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो. म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही.”
येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्या यहूदी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल, तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात.
मग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आणि सत्य तुम्हांला मोकळे करील.”
यहूदी लोकांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो तर आम्ही मोकळे होऊ असे तुम्ही का म्हणता?”
येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे.
गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही. परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो.
म्हणून जर पुत्र तुमजी सुटका करतो, तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल.
तुम्ही अब्राहामाचे लोक आहात हे मला माहीत आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारावयास टपलेले आहात. कारण तुम्हांला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे.
माझ्या पित्याने जे काही मला दाखवून दिले, तेच मी तुम्हांला सांगत आहे. परंतु तुमच्या पित्याने तुम्हांला सांगितले तेच तुम्ही करता.”
यहूदी लोकांनी उत्तर दिले. “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच अब्राहामाची संतति असता तर अब्राहामाने केल्या त्याच गोष्टी तुम्ही केल्या असत्या.
देवाकडून जे सत्य ऐकले ते तुम्हांला सांगणारा मी एक मनुष्य आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारायला पाहता. अब्राहामाने तसे केले नाही.
पण अब्राहामाने जे केले नाही ते तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत तर तुमचा पिता अब्राहाम नसून कोणी वेगळा आहे.” परंतु यहूदी म्हणाले, “ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही! देव आमचा पिता आहे. तोच एक आमचा पिता आहे.”
येशू त्या यहूदी लोकांना म्हणाला, “जर देव खरोखरच तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती. मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे. मी माझ्या स्वत:च्या अधिकारात आलो नाही. देवानेच मला पाठिले.
मी म्हणतो, मी देत असलेली शिकवण तुम्हांला समजत नाही का? कारण की तुम्हांला माझी शिकवण स्वीकारता येत नाही.
तुमचा पिता सैतान आहे. तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुनातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरूद्ध आहे. आणि सैतानाच्या ठायी सत्य नाही. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे. सैतान लबाड आहे. आणि तो असत्याचा पिता आहे.
मी सत्य बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही.
मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करु शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही?
जो देवाचा आहे, तो देवाचे म्हणणे ऐकतो. परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. कारण तुम्ही देवाचे लोक नाहीत.”
यहूदी म्हणाले, “तुम्ही शोमरोनी आहात, तुम्हांला भूताने पछाडले आहे, असे आम्ही म्हणालो तर आम्ही म्हणतो तेच बरोबर नाही काय?”
येशूने उत्तर दिले. “मला भूत लागले नाही, मी तर आपल्या पित्याचा मान राखतो. परंतु तुम्ही माझा मान राखीत नाही.
स्वत:ला सन्मान मिळविण्याचा प्रयत्न मी करीत नाही. माझा सन्मान व्हावा असे एकाला देवाला वाटते. तोच न्यायाधीश आहे.
मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही.
यहूदी लोक म्हणाले, “तुमच्यात खरोखर भूत संचारले आहे. हे आता आम्हांला माहीत झाले. अब्राहाम आणि संदेष्टे मेले. परंतु तुम्ही म्हणता, ‘जो माझ्या शिकवणूकीचे पालन करतो तो कधीच मरणार नाही.’
तुम्ही आमचा पिता अब्राहाम याच्यापेक्षाही थोर आहात असे तुम्हांला वाटते काय? अब्राहाम मेला, तसेच संदेष्टेही मेले. तुम्ही स्वत:ला समजता तरी कोण?”
येशूने उत्तर दिले, “जर मी स्वत:च स्वत:चा सन्मान केला तर त्या सन्मानाला काहीच अर्थ नाही. माझा पिता माझा सन्मान करतो. तो आमचा देव आहे असे तुम्ही म्हणता.
 परंतु तुम्ही खरोखर त्याला ओळखीत नाही. पण मी त्याला ओळखतो. तो सांगतो त्याचे पालन मी करतो. मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणालो, तर तुम्ही लबाड आहात तसा मीही लबाड ठरेन. परंतु मी त्याला नक्कीच ओळखतो. आणि तो जे काही सांगतो त्याचे पालन करतो.
माझ्या येण्याचा दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहाम आनंदित झाला होता. त्याने तो दिवास पाहिला आणि त्याला आनंद झाला.”
यहूदी लोक येशूला म्हणाले. “तुम्ही अब्राहामाला कधीच पाहिले नाही. तुम्ही पन्नास वर्षांचेही नाही!”
येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: अब्राहामाच्या जन्मापूर्वि पासून मी आहे.”
जेन्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले. पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला.
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया...

देवाचा महिमा वर्णावा








देवाचा महिमा वर्णावा
गौरव त्याचा करावा 
धन्यवाद देवाला द्यावा 
धन्यवाद देवाला द्यावा (२)


पापांची आम्हाला क्षमा करितो
करुणा कृपेची वृष्टी करितो (२)


सन्मार्गावरी आम्हाला चालवितो (२)
देवाचा अनुभव घ्यावा

धन्यवाद देवाला द्यावा

धन्यवाद देवाला द्यावा

देवाचा महिमा वर्णावा
गौरव त्याचा करावा 
धन्यवाद देवाला द्यावा 
धन्यवाद देवाला द्यावा (१)


रोज पहाटे आम्हाला जागवितो
कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो (२)


दिवसरात्र आम्हाला जपतो (२)
देवाचा अनुभव घ्यावा
धन्यवाद देवाला द्यावा
धन्यवाद देवाला द्यावा


देवाचा महिमा वर्णावा
गौरव त्याचा करावा 
धन्यवाद देवाला द्यावा 
धन्यवाद देवाला द्यावा (१)


उत्तम भाकर आम्हाला पुरवितो
जीवनाचे जल आम्हाला पाजवितो (२)


उत्तम आरोग्य आम्हाला देतो (२)
देवाचा अनुभव घ्यावा
धन्यवाद देवाला द्यावा
धन्यवाद देवाला द्यावा


देवाचा महिमा वर्णावा
गौरव त्याचा करावा 
धन्यवाद देवाला द्यावा 
धन्यवाद देवाला द्यावा (२)


स्वर्ग देवाचा महिमा गातात. आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही. तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात. आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो. सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या एखाद्या धावपटू सारखी करतो.
सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो. त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही. परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे. ती देवाच्या लोकांना शक्ती देते. परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे. त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्राच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
परमेश्वराची भीती शुध्द आहे. ती अखंड सहन करावी लागेल. परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत. ते संपूर्णत बरोबर आहेत.
परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे. ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
परमेश्वराच्या शिकवणी नेत्याच्या सेवकाला इशारा दिला. चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत. म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस. त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस. तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईनआणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचांरांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया...

रविवार, ३१ मे, २०२०

हा दिवस प्रभूचा आहे







Lyrics :- हा दिवस प्रभूचा आहे


हा दिवस प्रभूचा आहे
उल्हास व आनंद करू...(२)

किती थोर तो देव
सर्वस्व आपणांस दिले...(२)

तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे...(२)

हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना...(२)

हाल्लेलुया... हाल्लेलुया...
हाल्लेलुया...(२)

चला हो आता त्याकडे
महिमा स्तुती वर्णू...(२)

स्वर्गाच्या देवाला
स्तुतीचे गीत गाऊ...(२)

तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे...(२)

हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना...(२)

हाल्लेलुया... हाल्लेलुया...
हाल्लेलुया...(२)

त्याचा अनुभव घ्या
किती तो चांगला आहे...(२)

सैतानी बंधनातूनी
आपणांस सोडवितो...(२)

तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानयुग आहे...(२)

हा.. हा.. हा.. हा.. हाल्लेलुया
हो.. हो.. हो.. हो.. होसान्ना...(२)

हाल्लेलुया... हाल्लेलुया...
हाल्लेलुया...(२)


हा प्रभूचा दिवस आहे उल्हास व आनंद करा
पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले. 
देवाने आपण करीत असलेले काम संपवले म्हणून सातव्या दिवशी त्याने काम करण्यापासून विसावा घेतला. 
देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला. 
हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे. 
त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते. कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. 
पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. 
नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला. 
मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. 
परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली. 
एदेन बागेत एक नदी उगम पावली व तिने सर्व बागेला पाणी पुरवले. नंतर ती नदी विभागून तिच्या चार वेगळया नद्या झाल्या. 
पहिल्या नदिचे नाव पीशोन होते. ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते 
 त्या देशात चांगल्या प्रतीचे सोने सांपडते. तेथे मोती व गोमेद ही रत्ने सापडतात 
दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे, ही सगळ्या कूश म्हणजे इथिओपिया देशाभोवती वाहते. 
तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल. ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते. चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे. 
परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. 
परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली; परमेश्वर म्हणाला, "बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो. 
परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील." 
नंतर परमेश्वर बोलला, "मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन." 
परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली. 
आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील, रानावनातील जनावरे यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू - पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही. 
तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली. 
परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. 
तेव्हा आदाम म्हणाला,"आता ही मात्र माझ्यासारखी आहे. तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे. मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो. कारण ती नरापासून बनवलेली आहे." 
म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील. 
एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती. परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवाचे आभार मानुया...


राजा येशू आला




Lyrics :- राजा येशू आला

 

राजा येशू आला...(४)


सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

घालवूनी पापे
आणि दुःखे घोर...(२)

पुर्ण शांती द्यावयाला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

आनंदी आनंद
झालो पापमुक्त...(२)

मला शुद्ध करायाला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

वधस्तंभावरी
प्राण देता झाला...(२)

जगताचा त्राता झाला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(२)

राजांचा तो राजा
प्रभूंचा तो प्रभू...(२)

बोला सारे जय जय बोला
राजा येशू आला...(२)

राजा येशू आला...(४)

सैतानाला जिंकायाला
राजा येशू आला...(४)


दुसऱ्यांदा येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्या होता.
येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते.
येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “लोकांच्या समोर उभा राहा.”
नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जिवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” परंतु ते गप्प रहीले.
येशूने सर्वांकडे रागाने पाहिले. त्यांच्या मनाच्या कठीणतमुळे तोे फार खिन्न झाला. तो त्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर,” त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला.
नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबरयेशूविरूद्ध कट करू लागले.
येशू आपल्या शिष्यांसह गालील सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीयातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला.
कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व यरुशलेम, इदूमिया, यार्देनेच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सीदोनच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशूकडे आला.
मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांस एक छोठी होडी आणावयास सांगितली,
त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पूढे रेटीत होते.
जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”
पण त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की, मला प्रगट करू नका.
नंतर येशू डोंगरावर गेला आणि जे त्याला पाहिजे होते त्यांना त्याने स्वत:कडे बोलाविल. व ते त्याच्याकडे आले.
त्याने बारा जण निवडले व त्यांना प्रेषीत हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठविता यावे.
व त्यांना भुते काढण्याचा अधिकार असावा.
मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्याला पेत्र हे नाव दिले.
जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांना त्याने बेनेरेगेश, ज्याचा अर्थ ‘गर्जनेचे पुत्र’ असा होतो हे नाव दिले.
अंद्रिया, फिलीप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी
आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.
नंतर येशू घरी गेला आणि पुन्हा एकदा एवढा मोठा लोकसमुदाय जमला की, येशू व त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत.
त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणावयास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे.
यरूशलेमेहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, “याच्यामध्ये बालजबूल आहे.” आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भुतांना घालवून देतो.”
मग य़ेशूने त्यांना जवळ बोलाविले व बोधकथेच्या साहाय्याने त्याच्याशी बोलू लागला, “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल?
जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही.
आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही.
तर मग सैतान स्वत:लाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही. परंतु त्याचा शेवट होईल.
खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मिळकत लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान माणसाला बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.
मी तुम्हांस खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.
पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.
येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे.
नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले. ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलवावायास पाठविले.
लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, “पाहा तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.”
त्याने त्यांना उत्तर दिले. “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?”
येशूने जे त्याच्याभोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पाहा माझी आई आणि माझे भाऊ.”
जे जे कोणी देवाच्या इच्छेाप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई आहेत.”

धन्यवाद येशूला




                                 Lyrics :- धन्यवाद येशूला


धन्यवाद येशूला...(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
धन्यवाद येशूला...(२)

महिमा हो द्या त्याला...(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
महिमा हो द्या त्याला...(२)

गौरव द्या त्याला...(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
गौरव द्या त्याला...(२)

धन्यवाद येशूला...(४)

आलेलुया
राजांच्या राजाला
प्रभूंच्या प्रभूला
धन्यवाद येशूला...(२)

ख्रिस्त माझा तारणारा
मला वाटे प्रिय फार...(२)

ज्या ज्या वेळी ,होते दुःख
करिता धावा देतो सुख...(२)

ख्रिस्त माझा तारणारा
मला वाटे प्रिय फार...(२)

काय सांगू त्याचे प्रेम
देतो वारंवार क्षेम...(२)

ख्रिस्त माझा तारणारा
मला वाटे प्रिय फार...(२)

मला वाटे प्रिय फार...(२)


परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
इस्राएल, म्हण “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.
परमेश्वर मला मदत करणारा आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.
परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.
शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.
परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.
चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
परमेश्वराने मला शिक्षा केली परंतु त्याने मला मरु दिले नाही.
चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.
हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला.
परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा. “याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.”
परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो. बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.
परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया...

गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची




Lyrics :- गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची

 

गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची
आनंदे नाचुनी गाऊया...(४)

हालेलुया... हालेलुया...
हालेलुया... हालेलुया...(२)

येशूची प्रीती किती महान
माझ्या पापांसाठी केले बलिदान...(४)

हालेलुया... हालेलुया...
हालेलुया... हालेलुया...(२)

येशूचे रक्त किती महान
पापांच्या खाचेतून सोडविते...(४)

हालेलुया... हालेलुया...
हालेलुया... हालेलुया...(२)

येशूची शक्ती किती महान
सैतानी वारेतून सोडविते...(४)

हालेलुया... हालेलुया...
हालेलुया... हालेलुया...(२)


परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
सूर्य - चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले.
पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा. महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
देवाने अग्न्नी आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे आणि देवदार वृक्ष निर्मिले.
देवाने सर्व जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले. त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या. देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
देव त्याच्या माणसांना बलवान करील. लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील. लोक इस्राएलची स्तुती करतील. हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो. परमेश्वराची स्तुती करा.
हा प्रभूचा शब्द आहे आपण देवा चे आभार मानुया...

मंगळवार, १९ मे, २०२०

परमेश्वर मेंढपाळ माझा




Lyrics :- परमेश्वर मेंढपाळ माझा

परमेश्वर मेंढपाळ माझा
मजला कसली भीती
दिवसरात्र माझ्या सांगाती
मजवर त्याची प्रीती...(२)

हिरव्या कुरणी नेतो मजला
प्रेमे मजला चरवीतो...(२)

ओढ्याचे मज देतो पाणी
माझ्या जीवा फुलवितो

परमेश्वर मेंढपाळ माझा
मजला कसली भीती
दिवसरात्र माझ्या सांगाती
मजवर त्याची प्रीती...॥धृ॥

आपुल्या नावासाठी देव
सत्यपथाने मज नेतो...(२)

अरिष्टातुनी वाचवितो मज
माझ्या जीवाला जपतो

परमेश्वर मेंढपाळ माझा
मजला कसली भीती
दिवसरात्र माझ्या सांगाती
मजवर त्याची प्रीती...(२)

मजवर त्याची प्रीती...(२)


परमेश्वर माझा मेंढपाळ आहे तो मला सर्व अडचणीतून बाहेर काढतो

म्हणून सर्व प्रकारची दुष्टता, तसेच फसवणूक, ढोंगीपणा हेवा, निंदा यापासून सुटका करुन घ्या.

नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळासारखे तुम्ही शुद्ध आध्यात्मिक दूधाची इच्छा धरा. यासाठी की त्यापासून तुमची वाढ होईल व तुमचे तारण होईल.

आता “प्रभु चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे.”

जिवंत धोंडा जो प्रभु येशू त्याच्याकडे या. जो जगातील लोकांकडून नाकारला गेला. पण जो देवाला बहुमोल असा आहे आणि ज्याला देवानेच निवडले आहे.

तुम्हीसुद्धा, जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर बांधण्यासाठी रचिले जात आहा. पवित्र याजकगणांप्रमाणे सेवा करण्यासाठी, ज्यांचे काम म्हणजे आध्यात्मिक अर्पणाचा देवासमोर यज्ञ करणे असे आहे. जे देवाला, येशू ख्रिस्ताद्वारे मान्य आहे.

म्हणून खलील उतारा पवित्र शास्त्रात नमूद केला आहे:“पहा सियोनात मी कोनशिला बसवितो, जी मौल्यवान व निवडलेली आहे आणि जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो कधीही लज्जित होणार नाही.”

तुम्ही जे या धोंड्यावर विश्वास ठेवता, त्या तुम्हांला तो मौल्यवान आहे, पण जे विश्वास धरीत नाहीत त्यांना,“बांधणाऱ्यांनी नापंसत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आहे.”

तो असा झाला, “एक धोंडा जो लोकांना अडखळवितो आणि एक खडक जो लोकांना पाडतो.”

पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.

एकवेळ तुम्ही लोक नव्हता पण आता तुम्ही देवाचे लोक आहात. एके काळी तुम्हाला करुणा दाखविण्यात आली नव्हती पण आता तुम्हाला देवाची करुणा दाखविण्यात आली.

प्रियजनहो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की, तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा.

जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की, तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे.

प्रभुकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा.

राजाच्या अधीन असा, जो सर्वोच्च अधिकारी आहे आणि राज्यपालांच्या अधीन असा. कारण अयोग्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी प्रान्ताधिपतीने त्यांना पाठविले आहे.

म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अबिचारी बोलणे तुम्ही बंद करता आणि हीच देवाची इच्छा आहे.

मुक्त लोकांसारखे जगा. पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका. उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा.

सर्व लोकांचा आदर करा. ख्रिस्तातील तुमच्या बंधूवर्गावर प्रीति करा. देवाप्रती भीतीयुक्त आदर असू द्या. राजाला मान द्या.

घरातील गुलामांनो, संपूर्ण आदराने तुमच्या मालकाच्या अधीन असा, जे चांगले आणि दयाळू आहेत त्यांच्याशीच नव्हे तर जे कठोरतेने वागतात त्यांच्यासुद्धा अधीन असा.

कारण हे प्रशंसनीय आहे. जर एखादा त्याच्या अंत:करणात असलेल्या देवाच्या इच्छेसंबंधाने जागरुक आहे व अन्यायामुळे त्याला दु:ख सोसावे लागते.

कारण जर तुम्ही केलेल्या चुकीबद्दल तुम्हांला मार मिळाला आणि तुम्हांला तो सहन करावा लागतो, तर ते देवासमोर मान्य आहे.

यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे; कारण ख्रिस्ताने देखील आपल्यासाठी दु:ख सहन केले आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालावे, म्हणून स्वत:च्या अशा वागण्याने आपल्यासमोर उदाहण ठेवले.

“त्याने कोणतेही पाप केले नाही, त्याच्या मुखात कपट नव्हते.”

जेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला तेव्हा त्याने उलट अपमान केला नाही. जेव्हा त्याने दु:ख सहन केले तेव्हा त्याने धमकी दिली नाही. परंतु जो न्यायाने निवाडा करतो त्या देवाच्या हाती स्वत:ला सोपवून दिले.

त्याने स्वत:आमची पापे वाहिली त्याच्या शरीरावर घेऊन वधस्तंभावर वाहिली, यासाठी की आम्ही आमच्या पापाला मरावे. आणि नीतीमत्त्वासाठी जगावे. त्याला झालेल्या जखमांमुळे तुम्हाला आरोग्य मिळाले.

तुम्ही मेंढराप्रमाणे बहकत होता. पण आता तुमच्या जीवनाचा जो मेंढपाळ व संरक्षक त्याच्याकडे परत आला आहात.


येशू माझा मेंढपाळ




Lyrics :- येशू माझा मेंढपाळ


येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो...(२)

सुंदर डोंगरावरूनी नेतो
ओ...हो...हो...
मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो
ओ...हो...हो...(२)

येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो...(२)

मार्गात रक्षण आमुचे करतो
ओ...हो...हो...
सैतानापासून दूर ठेवतो
ओ...हो...हो...(२)

येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो...(२)

भिणार नाही आम्ही आता कूणाला
ख्रिस्तच आहे अमुच्या संगतीला...(२)

येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो...(३)

हाल्लेलुया आमेन...(४)

येशू माझा मेंढपाळ ... आमेन
आम्ही त्याची मेंढरे ... आमेन
हिरव्या कूरणात ... आमेन
आम्हाला चारीतो...


मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
“मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या मेंढपाळांविषयी नेत्यांविषयी बोल. माझ्यासाठी त्यांच्याबरोबर बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही इस्राएलचे मेंढपाळ स्वत:च फक्त चरत आहात. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्ही कळपाला खायला का घालत नाही?
तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या खाता, त्यांच्या लोकरीचा उपयोग स्वत:ला कपडे करण्याकरिता करता. तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण कळपाला खायला घालीत नाही.
तुम्ही दुर्बळांना सबळ केले नाही. तुम्ही आजारी मेंढ्यांची काळजी घेतली नाही. जखमींना मलमपट्टी केली नाही. काही मेंढ्या भरकटल्या पण तुम्ही जाऊन त्यांना परत आणले नाही. तुम्ही त्यांना शोधायला गेला नाहीत. नाही! तुम्ही फारच दुष्ट आणि निष्ठुर होता. आणि मेंढ्यांनाही तुम्ही दुष्टपणाने व निष्ठुरतेनेच वागविण्याचा प्रयत्न केला.
“आणि कोणीच मेंढपाळ नसल्याने मेंढ्या आता विखुरल्या आहेत. त्या हिंस्र पशूंचे भक्ष्य झाल्या आहेत, कारण त्या पसरल्या गेल्या.
माझा कळप सर्व डोंगरांतून व सर्व टेकड्यांवरुन भटकला, जगाच्या पाठीवरील प्रत्येक ठिकाणी विखुरला आणि त्याचा शोध घेण्यास कोणीही नव्हते.”
म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो,
“मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो. हिंस्र पशूंनी माझ्या मेंढ्या पकडल्या. खरंच! माझ्या मेंढ्या वन्य प्राण्यांचे भक्ष्य झाल्या. का? कारण त्यांना खरा मेंढपाळ नव्हता. माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपावर लक्ष ठेवले नाही. नाही! त्यांनी फक्त मेंढ्या मारल्या व स्वत:ची पोटे भरली. त्यांनी माझ्या कळपाला खाऊ घातले नाही.”
तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
परमेश्वर म्हणतो, “मी त्या मेंढपाळांच्याविरुद्ध आहे. मी माझ्या मेंढ्या त्यांच्याकडून परत मागीन. मी त्यांच्यावर तोंडसुख घेईन. ह्यापुढे ते माझे मेंढपाळ असणार नाही. मग ते स्वत:च्या तुंबड्या भरु शकणार नाहीत. आणि त्यांच्यापासून मी माझ्या कळपाला वाचवीन. मग माझ्या मेंढ्या त्यांचे भक्ष्य होणार नाहीत.”
परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी स्वत:च त्यांचा मेंढपाळ होईन. मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन.
मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल, तर त्या भरकटू लागताच, तो त्यांचा शोध घेईल, त्याचप्रमाणे, मी करीन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. त्या अंधाऱ्या व ढगाळ दिवशी, त्या जेथे जेथे विखुरल्या असतील, तेथून तेथून मी त्यांना परत आणीन.
त्या त्या राष्ट्रांतून मी त्यांना परत आणीन. निरनिराळ्या देशांतून मी त्यांना एकत्र आणीन. मी त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी चरु देईन.
मी त्यांना चांगल्या कुरणांत नेईन. इस्राएलच्या डोंगरावरील उंच ठिकाणी त्या जातील. तेथे चांगल्या डोंगरावरील उत्तम हिरवळीवर त्या चरतील.
 हो! मी माझ्या कळपाला खायला घालीन. आणि त्यांना विश्रांतीच्या जागी घेऊन जाईन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
“हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन. भटकलेल्यांना मी परत आणीन. जखमी झालेल्या मेंढ्यांना मी मलमपट्टी करीन. दुर्बलांना मी सबळ करीन. मी त्या लठ्ठ व मत्त मेंढपाळांचा मात्र नाश करीन. त्यांना योग्य अशीच शिक्षा मी देईन.”
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, तू माझ्या कळपा “मी माझ्या कळपातील मेंढ्या - मेंढ्यात, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन.
सुपीक जमिनीवर वाढणारे गवत तुम्ही खाऊ शकता. मग इतर मेंढ्यांचे गवत तुम्ही का चिरडून टाकता? तुम्ही भरपूर शुद्ध पाणी पिऊ शकता. मग तुम्ही इतरांचे प्यायचे पाणी का ढवळता?
तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत आणि ढवळलेले पाणी, माझ्या कळपाने प्यायलेच पाहिजे.”
म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, त्यांना म्हणतो, “मी स्वत: लठ्ठ मेंढी आणि बारीक मेंढी ह्यांच्यात निवाडा करीन.
तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. तुमच्या शिंगांनी तुम्ही दुर्बळ मेंढ्यांना खाली पाडता. तुम्ही, त्यांना ढकलून दूर घालवून देता.
म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे हिंस्र पशू त्यांना पकडणार नाहीत. मी मेंढ्या - मेंढ्यात न्यायनिवाडा करीन.
मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन. माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांना खायला घालील व त्यांच्या मेंढपाळ होईल.
मग मी, परमेश्वर व प्रभू, त्यांच्या देव होईन. माझा सेवक, दावीद राजा म्हणून त्यांच्यात राहील हे माझे परमेश्वराचे शब्द आहेत.
“मी माझ्या मेंढ्यांबरोबर एक शांततेचा करार करीन. मी अपायकारक प्राण्यांना या भूमीतून दूर करीन. मग मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहू शकतील आणि रानात सुरक्षितपणे झोपू शकतील.
माझ्या टेकडी यरुशलेम भोवतालच्या जागा आणि मेंढ्या ह्यांना मी आशीर्वाद देईन. योग्य वेळी मी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांच्या वर्षावात न्हाऊन निघतील.
शेतांत वाढणारी झाडे फळतील. पृथ्वीवर सुगीचा मोसम येईल. त्यामुळे मेंढ्या त्यांच्या बळापासून मी त्यांना वाचवीन. मग त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे.
यापुढे इतर राष्ट्रांकडून ते प्राण्याप्रमाणे पकडले जाणार नाहीत. हिंस्र पशू त्यांना खाणार नाहीत. ते सुखरुप राहतील. त्यांना कोणीही घाबरिणार नाही.
जी सुंदर आणि प्रसिद्ध होईल, अशी जमीन मी त्यांना देईन. मग त्या देशात त्यांची उपासमार होणार नाही. यापुढे इतर राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही.
मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलच्या लोकांना ती माझी माणसे आहेत हेही कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. तुम्ही फक्त माणसे आहात आणि मी तुमचा देव आहे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.


तू है स्वामी तू चरवाहा




Lyrics :- तू है स्वामी तू चरवाहा


तू है स्वामी , तू चरवाहा
निगाह मुझ पे तेरी सदा...(४)

जहाँ जहाँ है हरियाली...(२)

वहाँ मुझे तू लिए चला...(२)

तू है स्वामी , तू चरवाहा
निगाह मुझ पे तेरी सदा...(२)

जहाँ बहे झरना मीठा...(२)

वहाँ मुझे तू लिए चला...(२)

तू है स्वामी , तू चरवाहा
निगाह मुझ पे तेरी सदा...(२)

जहाँ दिव्य सत की छाया...(२)

वहाँ मुझे तू लिए चला...(२)

तू है स्वामी , तू चरवाहा
निगाह मुझ पे तेरी सदा...(२)

जहाँ नहीं है डर कोई...(२)

वहाँ मुझे तू लिए चला...(२)

तू है स्वामी , तू चरवाहा 

निगाह मुझ पे तेरी सदा...(५)


येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जेव्हा एखादा मनुष्य मेंढवाड्यात प्रवेश करतो, तेव्हा त्याने दाराचाच उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटारु आहे. तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे.
परंतु मेंढरांची काळजी घेणारा दारातूनच आत जातो, तो मेंढपाळ आहे.
दारावरचा पहारेकरी मेंढपाळासाठी दार उघडतो आणि मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात, मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाका मारतो, आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो.
आपली सर्व मेंढरे बाहेर पडल्यावर तो त्यांच्या पुढे पुढे चालतो. त्यांचे नेतृत्व करतो. मेंढरे त्याच्या मागोमाग जातात. कारण ती त्याचा आवाज ओळखतात.
अनोळखी माणसांच्या मागे मेंढरे कधीच जाणार नाहीत. ती त्या माणसापासून दूरपळून जातील. कारण त्यांना त्यांचा आवाज परिचयाचा नसतो.
येशूने लोकांना हा दाखला सांगितला. परंतु तो काय सांगत आहे हे लोकांना समजले नाही.
म्हणून येशू पुन्हा म्हणाला. “मी तुम्हांला खरे सांगतो. मी मेंढरांचे दार आहे.
माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटारु होते. मेंढरांनी त्यांचे आवाज ऐकले नाहीत.
मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल.
चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. परंतु मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे.
मी चांगाला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्चा मेंढरासाठी स्वत:चा जीव देतो.
ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो. मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणार माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करुन त्यांची दाणादाण करतो.
मजूर पळून जातो कारण तो रोजंदारीवरचा कामगार असतो, तो मेंढरांची खरी काळजी करीत नाही.
मी मेंढरांची लोकांची काळजी घेणारा मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो तसा मी माझ्या मेंढरांना ओळखतो. आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझी मेंढरे मला ओळखतात. या मेंढरांसाठी मी आपला जीव देतो.
माझी दुसरीही मेंढरे आहेत ती येथे या कळपात नाहीत. त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे. ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्यकाळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता मजवर प्रीति करतो. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो.
तो कोणी माझ्यापासून घेत नाही. मी माझा स्वत:चा जीव स्वत:च्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे. आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे. हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे.”
येशूने सांगितलेल्या ह्या गोष्टींमुळे यहूदी लोकांचे आपापसात एकमत होईना.
यहूदी लोकांपैकी पुष्कळजण म्हणाले, ‘याला भूत लागले आहे. म्हणून याचे डोके ठिकाणावर नाही. त्याचे का ऐकावे?”
परंतु दुसरे काही जण म्हणाले, “हा करतो तशा गोष्टी भूताने डोके फिरविलेला मनुष्य करीत नाही. भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय? मुळीच नाही!”
यरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सणजवळ आला. तो हिवाळा होता.
येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीतत होता.
यहूदी लोक येशूच्याभोवती जमा झाले, आणि म्हणाले. “किती दिवस तुम्ही आम्हांला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हांला तसे स्पष्टच सांगा!”
येशूने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला आधीच सांगितले. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो, ती कामे सुध्दा मी कोण आहे याची साक्ष देतात.
पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे लोक नाहीत.
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात.
मी माझ्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत. आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही.
माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही.
माझा पिता आणि मी एक आहोत.”
तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडें उचलले.
परंतु येशू त्यांना म्हणाला, “पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जिवे मारीत आहात?”
यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हांला मारीत नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत. तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वत:ला देवासारखेच आहोत असे मानता! आणि म्हणून आम्ही तुम्हांला धोंडमार करुन ठार करीत आहोत!”
येशूने उत्तर दिले, “तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे; ‘मी म्हणालो, तुम्ही देव आहात’
ज्या लोकांना देवाने त्याची आज्ञा वचने दिली त्यांच्याविषयी ते सांगते. पवित्र शास्त्रात त्या लोकांना देवाने असे म्हटले आणि पवित्र शास्त्र नेहमीच खरे आहे.
त्याच्या कामासाठी देवाने मला निवडले. देवाने मला जगात पाठविले. मी देवाचा पुत्र आहे. आणि तुम्ही म्हणता, मी बोलतो त्या गोष्टी देवाविरूद्ध आहेत,
जे माझा पिता करतो ते जर मी करत नाही, तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका.
परंतु माझा पिता करतो तीच कृत्यांवर जर मी करतो, तर मी करतो त्या माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मी करतो त्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवा. मग तुम्ही ओळखाल आणि समजून घ्याल की, पिता माइयामध्ये आहे, आणि मी पित्यामध्ये आहे.”
यहूदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला. परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला.
मग येशू यार्देन नदी ओलांडून माघारी गेला. येशु जथे योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे तेथे गेला. येशू तेथेच राहिला.
आणि पुष्कळ लोक त्याच्यकडे आले. लोक म्हणाले, “योहानाने कधी चमत्कार केला नाही. परंतु योहानाने या मनुष्याविषयी जे सांगितले ते खरे आहे.”
आणि त्याठिकाणी अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.


प्रभु गाऊ तुझे गुण राया




                                  Lyrics :- प्रभु गाऊ तुझे गुण राया


प्रभु गाऊ तुझे गुण राया
प्रभु तुचि प्रेमळ बापा...(२)

धरतीचा तू निर्माता
आकाशाचा तू विधाता
तार्यांचा तूची कर्ता
जगताचा तूची त्राता

तुज शोधु कुठे मी राया
प्रभु तुचि प्रेमळ बापा

प्रभु गाऊ तुझे गुण राया
प्रभु तुचि प्रेमळ बापा...॥धृ॥

वार्यांची झुळझुळ विरली
लाटांची खळखळ सरली
दुःखाने होते जग भरले
यामधुनि तू जन्मा आला

उपकार कसे मी फेडू
प्रभु तुचि प्रेमळ बापा

प्रभु गाऊ तुझे गुण राया
प्रभु तुचि प्रेमळ बापा...(५)


सियोन वरुन रणशिंग फुंका! माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या. ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा भीतीने थरकाप उडू द्या. परमेश्वराचा खास दिवस येत आहे. परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे.
तो काळोखा, विषण्ण दिवस असेल. तो अंधकारमय व ढगाळ दिवस असेल. सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल. ते सैन्य प्रचंड न शक्तिशाली असेल. यापूर्वाे कधी झाले नाही आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही.
धगधगती आग जसा नाश करते, तसा देशाचा नाश हे सैन्य करील. त्यांच्यासमोरची भूमी एदेनच्या बागेसारखी असेल, पण त्यांच्या मागे निर्जन वाळवंट असेल.त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.
ते घोड्यांप्रमाणे दिसतात सैन्यातील घोड्याप्रमाणे ते धावतात.
त्यांचा आवाज ऐका. तो आवाज, पर्वतावर चढणाऱ्या रथांच्या खडखडाटाप्रमाणे आहे. फोलकटे जाळणाऱ्या आगीप्रमाणे तो आवाज आहे. ते बलवान आहेत. ते युध्दासाठी सज्ज आहेत.
ह्या सैन्यापुढे लोक भीतीने थरथर कापतात आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात.
सैनिक जोरात पळतात. ते तटांवर चढतात. प्रत्येक सैनिक सरळ पुढे कूच करतो. ते आपला मार्ग सोडीत नाहीत.
ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातो. जरी एकावर वार होऊन तो पडला, तरी दुसरे कूच करीतच राहतात.
ते नगरीकडे धाव घेतात. ते त्वरेने तटावर चढतात. ते घरात शिरतात. चोराप्रमाणे ते खिडक्यांतून शिरतात.
त्यांच्यापुढे धरणी व आकाश कापते, चंद्र-सूर्य काळे पडतात आणि तारे तळपत नाहीत.
परमेश्वर त्याच्या सैन्याला मोठ्याने हाक मारतो. त्याचा तळ फार मोठा आहे. सैन्य त्याच्या आज्ञा पाळते. ते सैन्य खूप बलशाली आहे. परमेश्वराचा खास दिवस हा विलक्षण आणि भयंकर आहे. तो कोण सहन करू शकेल?
परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे: “मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्ये केलीत. रडा, शोक करा आणि उपवास करा.
तुमचे कपडे फाडू नका, तर ह्रदये फाडा”परमेश्वराकडे, तुमच्या परमेश्वराकडे परत या. तो कृपाळू व दयाळू आहे. तो शीघ्रकोपी नाही. तो खूप प्रेमळ आहे. त्याने योजलेली कडक शिक्षा कदाचित् तो बदलेलही.
कदाचित परमेश्वराचे मन: परिवर्तन होईलही, कोणी सांगावे! आणि कदीचित तो त्याच्या मागे तुमच्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल. मग तुम्ही परमेश्वराला. तुमच्या परमेश्वराला, अन्नार्पणे व पेयार्पणे देऊ शकाल.
सियोन वरून रणशिंग फुंका. खास सभा बोलवा. उपवासाची विशिष्ट वेळ ठरवा.
लोकाना एकत्र जमवा, खास सभा बोलवा, वृध्दांना एकत्र आणा मुलांना एकत्र जमवा, तान्ह्या मुलांना एकाठिकाणी जमवा. शय्यागृहातून नवरा नवरीलाही येऊ द्या.
याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. ह्या सर्व लोकांनी म्हणावे, “परमेश्वरा, तुझ्या माणसांवर दया कर. तुझ्या माणसांची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. तुझी माणसे दुसऱ्या लोकांनी आम्हाला हसू नये वक्ष “कोठे आहे तुमचा परमेश्वर?” असे विचारू नये.
मग, देशासाठी, परमेश्वराच्या भावना उत्तेजित झाल्या. त्याला, त्याच्या लोकांबद्दल वाईट वाटले.
परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “मी तुमच्याकडे पुन्हा धान्य, द्राक्षरस आणि तेल पाठवीन. तुम्ही तृप्त व्हाल. ह्यापुढे, इतर राष्ट्रांत तुमची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही.
मी उत्तरेकडून आलेल्या लोकांना तुमचा देश सोडायला भाग पाडीन. मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात जायला लावीन. त्यातील काही पूर्व समुद्राकडे जातील. तर काही पश्चिम समुद्राकडे जातील. त्या लोकांनी फारच भयंकर कृत्ये केली आहेत. ते मृतांप्रमाणे व सडलेल्या गोष्टींसारखे होतील. तेथे भयंकर दुर्गधी पसरेल.”
हे भूमी, घाबरू नकोस. सुखी आणि हर्षाल्लासित हो! कारण परमेश्वर महान गोष्टी घडवून आणणार आहे.
रानातल्या प्राण्यानो, घाबरू नका. कारण वाळवंटातील कुरणांत हिरवळ उगवेल, झाडांना फळे लागतील. अंजिराची झाडे व द्राक्षवेली फळांनी लगडतील.
म्हणून सियोनवासीयांनो, आनंदित व्हा. तुमच्या परमेश्वर देवामध्ये संतोष माना. तो कृपावंत होऊन, पाऊस देईल. तो पूर्वाप्रमाणेच, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडील.
खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतुनच्या तेलाने भरून वाहतील.
“मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले.पण, मी, परमेश्वर, तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन.
मग तुम्हाला भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल. तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल. त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
मी इस्राएलच्या बाजूने आहे हे तुम्हाला समजेल. मीच परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे, हेही तुम्हाला कळून येईल. माझ्याशिवाय दुसरा कोणताच परमेश्वर नाही. माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.”
 “ह्यांनंतर मी माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन. तुमची मुले-मुली भविष्य सांगतील तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील.
त्या वेळी, मी माझा आत्मा पुरूष व स्त्री सेवकांमध्येसुध्दा ओतीन.
मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक खुणा दाखवीन तेथे रक्त, आग व दाट धूर दिसेल.
सूर्याऐवजी अंधार होईल. चंद्राचे रूपांतर रक्तात होईल. मग परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवेल.
आणि तेव्हा, परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल. वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर व यरुशलेममध्ये असतील. परमेश्वराने सांगितलेयाप्रमाणेच हे घडेल. परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील.

देव माझा मेंढपाळ




                                  Lyrics :- देव माझा मेंढपाळ


देव माझा मेंढपाळ
माझा करितो सांभाळ...(२)

तोच प्रेमे चालवितो
रम्य कुरणात नेतो...(२)

कुरणात मला चारी
तान-भूक दूर सारी

देव माझा मेंढपाळ
माझा करितो सांभाळ...(२)

माझ्या गरजा पुरवी
सर्व क्लेश तो पळवी...(२)

दिन-रात माझ्या संगे
सांभाळितो मज सुखे

देव माझा मेंढपाळ
माझा करितो सांभाळ...(२)

मृत्युच्याहि दरिमधी
भय मजला न कधी...(२)

देव माझा पाठीराखा
भय मजला मग का

देव माझा मेंढपाळ
माझा करितो सांभाळ...(२)

माझा करितो सांभाळ...(२)


ईश्वर, इस्राएलचा देव त्या मेंढपाळांना पुढील गोष्टी सागंतो “तुम्ही मेंढपाळांनी माझ्या मेंढ्यांना चारी दिशांना पळून जाण्यात भाग पाडले आहे. त्यांना तुम्ही जबरदस्तीने लांब जायला लावले. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. पण मी तुमची काळजी घेईन. मी तुम्हाला तुमच्या वाईट कृत्यांबद्दल शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
मी माझ्या मेंढ्या दुसऱ्या देशांत पाठविल्या पण ज्या मेंढ्या लोक दुसऱ्या देशात गेल्या आहेत, त्यांना मी गोळा करीन. मी त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. त्या मेंढ्या त्यांच्या कुरणात परत आल्यावर, त्यांना पुष्कळ संतती होऊन त्यांची संख्या वाढेल.
मी माझ्या मेंढ्यांसाठी नवीन मेंढपाळ  नेमीन. ते मेंढपाळ माझ्या मेंढ्यांची (लोकांची) काळजी घेतील व माझ्या मेंढ्या घाबरणार नाहीत वा भयभीत होणार नाहीत. माझी एकही मेंढी माणूस हरवणार नाही.” हा परमेश्वरातडून आलेला संदेश आहे.
हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी चांगला अंकुर निर्माण करण्याची वेळ येत आहे.” तो चांगला अंकुर सुज्ञपणे राज्य करणारा राजा असेल. देशात योग्य व न्याय्य गोष्टी तो करेल.
त्या चांगल्या ‘अंकुराच्या’ काळात यहूदातील लोक वाचतील आणि इस्राएल सुरक्षित राहील. त्याचे नाव असेल परमेश्वर आमचा चांगुलपणा.
“चिरंजीव असणाऱ्या, एकमेव असणाऱ्या परमेश्वराने इस्राएलच्या लोकांना मिसर देशातून बाहेर आणले’ हे जुने वचन लोक पुन्हा उच्चारणार नाहीत, असे दिवस येत आहेत.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
पण लोक काही नवीनच बोलतील. ‘परमेश्वर चिरंजीव आहे परमेश्वर एकमेव आहे. त्याने इस्राएलच्या लोकांना उत्तरेकडील देशातून बाहेर आणले. त्याने त्या लोकांना ज्या ज्या देशात पाठविले होते, त्या त्या देशांतून बाहेर आणले.’ मग इस्राएलचे लोक त्यांच्या स्वत:च्या देशात राहतील.”
संदेष्ट्यांना संदेश: मी फार दु:खी आहे. माझे हृदय विदीर्ण झाले आहे. माझी सर्व हाडे धरधरत आहेत. माझी यिर्मयाची स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे. का? परमेश्वरामुळे व त्याच्या पवित्र शब्दांमुळे.
व्यभिचाराचे पाप केलेल्या लोकांनी यहूदा भरुन गेला आहे. लोकांनी अनेक मार्गांनी निष्ठेचा त्याग केला आहे. परमेश्वराने शाप दिला आणि ही भूमी ओसाड झाली. कुरणातील हिरवळ वाळून मरत आहे. शेते वाळवंटाप्रमाणे झाली आहेत. संदेष्टे दुष्ट आहेत ते त्यांचे बळ वजन व शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात.
“संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा पापी आहेत. माझ्या मंदिरात दुष्कृत्ये करताना मी त्यांना पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
“मी माझा संदेश त्यांच्याकडे पाठविण्याचे बंद करीन. मग त्यांची स्थिती अंधारात चालणाऱ्यांसारखी होईल. मी असे केल्यास संदेष्टे व याजक ह्यांच्यासाठी वाट जणू निसरडी होईल. ते त्या अंधारात पडतील मी त्यांच्यावर अरीष्ट आणीन. मी त्यांना शिक्षा करीन.” हा देवाकडून आलेला संदेश आहे.
“शोमरोनच्या संदेष्ट्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे मी पाहिले. मी त्यांना बआल या खोट्या दैवताच्या नावाने भविष्य वर्तविताना पाहिले. त्यांनी इस्राएलच्या लोकांना परमेश्वरापासून दूर नेले.
आता मी यहूदाच्या संदेष्ट्यांना यरुशलेममध्ये भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. ते व्यभिचाराचे पाप करतात. ते खोट्या गोष्टी एकतात आणि खोट्या शिकवणुकीचे पालन करतात. ते दुष्टांना दुष्कृत्ये करायला प्रोत्साहन देतात. म्हणून लोक पाप करीतच राहतात. ते सदोममधील माणसाप्रमाणे आहेत. यरुशलेम आता मला गमोऱ्यासारखे वाटते.”
सर्वशक्तिमान परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल म्हणतो, “मी त्या संदेष्ट्यांना शिक्षा करीन. विषमिश्रित अन्न खाण्यासाखी वा जहरमिश्रित पाणी पिण्यासारखी ती शिक्षा असेल. संदेष्ट्यांनी हा आध्यात्मिक आजार आणला व तो सर्व देशात पसरला म्हणून मी त्यांना शिक्षा करीन. हा आजार यरुशलेममधील संदेष्ट्यांकडून आला.”
सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो: “हे संदेष्टे तुम्हाला जे काय सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुम्हाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. ते दृष्टांन्ताबद्दल बोलतात. पण हे दृष्टांन्त त्यांना माझ्याकडून घडत नाहीत, तर ते त्यांच्या मनाचेच असतात.
काही लोक परमेश्वराकडून आलेल्या खऱ्या संदेशाला नाके मुरडतात म्हणून हे संदेष्टे त्या लोकांना निराळ्याच गोष्टी सांगतात. ते म्हणतात, ‘तुम्हाला शांती लाभेल’ काही लोक फार हट्टी आहेत. ते त्यांना पाहिजे त्याच गोष्टी करतात. मग ते संदेष्टे त्याना म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही.’
पण ह्या संदेष्ट्यांमधील कोणीही स्वर्गातील देवांच्या सभेतउभा राहिलेला नाही. त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराचा संदेश पाहिला वा ऐकला नाही. कोणीही परमेश्वराच्या संदेशाकडे बारकाईने लक्ष दिलेले नाही.
आता परमेश्वराकडून वादळाप्रमाणे शिक्षा येईल. परमेश्वराचा राग तुफानाप्रमाणे असेल. तो त्या दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळून त्यांच्या डोक्यांचा चेंदामेंदा करील.
परमेश्वराने जे करण्याचे ठरविले आहे, ते पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचा राग शांत होणार नाही. पुढील दिवसांत तुम्हाला हे स्पष्टपणे समजेल.
मी त्या संदेष्ट्यांना पाठविले नाही, पण तेच संदेश द्यायला धावले. मी त्यांच्याशी बोललो नाही, पण तेच माझ्यावतीने उपदेश करतात.
जर ते माझ्या स्वर्गीय सभेत उभे राहिले असते, तर त्यांनी माझा संदेश यहूदाच्या लोकापर्यंत पोहोचविला असता. त्यांनी लोकांना दुष्कृत्ये करण्यापासून परावृत्त केले असते. त्यांनी लोकांना पाप करु दिले नसते.”
हा परमेश्वराचा संदेश आहे, “मी देव येथे आहे पण मीच देव दूरवरच्या स्थळीही असतो.”
एखादा माणूस माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीलही, पण त्याला शोधणे मला अगदी सोपे आहे. का? कारण मी स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांमध्ये सगळीकडे आहे.” परमेश्वर असे म्हणाला.
“काही संदेष्टे माझ्या नावाने खोटा उपदेश करतात. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे!’ मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे.
हे किती काळ चालणार? ते खोट्याचाच विचार करतात आणि त्याच खोट्या, असत्य गोष्टी लोकांना शिकवितात.
हे संदेष्टे, यहूदाच्या लोकांना माझे विस्मरण व्हावे असा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून ते हे करीत आहेत. त्याचे पूर्वज जसे माझे नाव विसरले, तसेच आता ह्या लोकांनी मला विसरावे म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ह्यांचे पूर्वज मला विसरले आणि त्यांनी खोटे दैवत बआलची पूजा केली,
काडी म्हणजे गहू नव्हे. जर एखाद्या माणसाला त्याच्या स्वप्राबद्दल सांगायचे असेल, तर सांगू द्या. पण जो कोणी माझा संदेश ऐकतो, त्याला सत्य सांगू द्यावे.
माझा संदेश अग्नीप्रमाणे आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे आहे.
“म्हणून मी खोट्या संदेष्ट्यांविरुध्द आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “हे संदेष्टे एकमेकांकडून माझे शब्द चोरतात.
मी त्यांच्याविरुद्ध आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते त्यांचे स्वत:चे शब्द वापरतात आणि ते माझेच शब्द आहेत असे भासवितात.
खोट्या स्वप्नांबद्दल सांगणाऱ्या खोट्या संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “ते त्यांच्या खोट्या बोलण्याने व चुकीच्या शिकवणुकीने माझ्या लोकांना चुकीच्या मार्गांने नेतात. लोकांना शिकविण्यासाठी मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते यहूदाच्या लोकांना मुळीच मदत करु शकत नाहीत.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
“यहूदातील लोक वा संदेष्टे किंवा याजक कदाचित् तुला विचारतील ‘यिर्मया, परमेश्वराने काय घोषणा केली आहे?’ तू त्यांना उत्तर दे, ‘तुम्ही म्हणजेच परमेश्वराला फार मोठे ओझे आहात. मी हे ओझे खाली टाकून देईन”‘ हा परमेश्वराचा संदेश आहे.
कदाचित् एखादा संदेष्टा वा एखादा याजक किंवा एखादा माणूस म्हणेल ‘परमेश्वराची घोषणा ही आहे.’ तो खोटे बोलला. मी त्याला व त्याच्या सर्व कुटुंबाआला शिक्षा करीन.
तुम्ही एकमेकांना असे विचारु शकता, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले?’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’
पण तुम्ही कधीही ‘परमेश्वराची घोषणा भारी बोजा असा वाक्‌प्रचार वापरु नये.’ कारण परमेश्वराचा संदेश हा कोणालाही भारी बोजा वाटता कामा नये. पण तुम्ही आमच्या देवाचे शब्द बदलता. तो जीवंत, सर्वशक्तिमान परमेश्वर आहे.
“तुम्हाला जर देवाच्या संदेशाबद्दल जाणून घ्यायचे आसेल, तर संदेष्ट्याला विचारा ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले’ किवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’
पण ‘परमेश्वराची घोषणा भारी बोजा काय आहे?’ असे म्हणून नका. जर तुम्ही असे शब्द वापराल, तर परमेश्वर तुम्हाला म्हणेल, ‘तुम्ही माझ्या संदेशाला ‘परमेश्वराची घोषणा भारी बोजा असे म्हणू नेय.’ हे शब्द वापरु नका असे मी बजावले.
पण तुम्ही माझ्या संदेशाला ‘भारी बोजाच’ म्हणालात. म्हणून मी तुम्हाला. मोठ्या ओझ्याप्रमाणे वर उचलून माझ्यापासून लांब फेकून देईन. मी तुमच्या पूर्वजांना यरुशलेम नगरी दिली. पण मी तुम्हाला आणि त्या नगरीला माझ्यापासून दूर फेकीन.
मी तुम्हाला अप्रतिष्ठित करीन आणि ही बदनामी हा ओशाळवाणेपणा तुम्ही कधीही विसरु शकणार नाही.”

देवा तुझ्या दयेची मज लागली तहान




                                  Lyrics :- देवा तुझ्या दयेची मज लागली तहान


देवा तुझ्या दयेची
मज लागली तहान
तुझ्या कृपेचा भुकेला
दे खावयास अन्न

देवा तुझ्या दयेची
मज लागली तहान...॥धृ॥

प्रभु तूच मेंढपाळ
माझा करी सांभाळ...(२)

विश्वास करण्या मजला
दे विश्वासाचे दान...(२)

देवा तुझ्या दयेची
मज लागली तहान...॥धृ॥

शिकविले प्रीती करण्या
शांतीचे जीवन जगण्या...(२)

दे शांती प्रीती मजला
तू जीवनाची खाण...(२)

देवा तुझ्या दयेची
मज लागली तहान
तुझ्या कृपेचा भुकेला
दे खावयास अन्न

देवा तुझ्या दयेची...


नंतर येशू गालील किंवा तिबिर्या सरोवराच्या पलीकडे गेला.
तेव्हा पुष्कळ लोक येशूच्या मागे गेले. कारण येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले. व निरनिराळ्या मार्गांनी आपले जे सामर्थ्य दाखविले ते लोकांनी पाहिले. म्हणून ते त्याच्यामागे गेले.
मग येशू टेकडीच्या वर चढून गेला. तो आपल्या शिष्यांसह तेथे बसला.
त्याच सुमारास यहूदी लाकांचा वल्हांडण सण जवळ आला होता.
येशूने नजर वर करुन पाहिले तो लाकांचा मोठा समुदाय आपणांकडे येताना त्याला दिसला. येशू फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांना पुरेशा भाकरी कोठून विकत आणाव्या बरे?”
फिलिप्पची परीक्षा पाहण्यासाठी येशूने त्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण काय करायचे याचा विचार येशूने अगोदरच करुन ठेवला होता.
फिलिप्पने उत्तर दिले, “येथील प्रत्येकाला थोडी थोडी भाकर दिली तरी या सर्वांना पुरेशा भाकर विकत घेण्यासाठी आपणा सर्वांना महिनाभर काम करावे लागेल.”
आंद्रिया नावाचा दुसरा एक शिष्य तेथे होता. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ होता.
आंद्रिया म्हणाला, “येथे असलेल्या एका लहान मुलाजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. परंतु इतक्या लोकांना त्या पुरणार नाहीत.”
येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” ती बरीच गवताळ अशी जागा होती. तेथे खाली बसलेले सुमारे पाच हजार पुरुष होते.
मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या; येशूने भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या. मासे घेऊन त्याने तसेच केले. येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले.
सर्व लोकांना खाण्यासाठी भरपूर होते. जेवण झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाऊन उरलेले भाकरींचे व माशांचे तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”
म्हणून शिष्यांनी उरलेले तुकडे जमा केले. लोकांनी जेवायाला सुरुवात केली, तेव्हा जवाच्या फत्त पाच भाकरी तेथे होत्या. शिष्यांनी उरलेल्या तुकडचांच्या बारा टोपल्या भरल्या.
येशूने केलेला हा चमत्कार लोकांनी पाहिला, तेव्हा ते म्हणाले, “जगात येणारा संदेष्टा तो खरोखर हाच असला पाहिजे.”
आपण राजा बनावे असे लोकांला वाटते हे येशूला माहीत होते. येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला. तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात गेला.
त्या संध्याकाळी येशूचे शिष्य गालील सरोवराकडे गेले.
शिष्य एका नावेत बसून सरोवरापलीकडील कफर्णहूम नगराकडे निघाले. आता अंधार पडला होता आणि येशू अजून त्यांच्याकडे आलेला नव्हता.
वारा फारच जोराने वाहत होता आणि सेरोवरात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या होत्या.
त्यांनी नाव तीन ते चार मैल वल्हवीत नेली तेव्हा त्यांना येशू नावेकडे येताना दिसला. तो सरोवराच्या पाण्यावरुन चालत होता, तो नावेकडेच येत होता. तेव्हा शिष्य घाबरले.
परंतु येशू त्यांना म्हणाला. “मी आहे, भिऊ नका.”
येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदोने येशूला नावेत घेतले. आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली.
दुसरा दिवस उजाडला. काही लोक सरोवराच्या दुसऱ्या काठावर राहिले होते. त्या लोकांनामाहीत होते की, येशू शिष्यांबरोबर नावेतून गेलेला नव्हता, त्यांना समजले की, येशूचे शिष्य नावेत बसून निघून गेलेत आणि तेथे असलेली तेवढीच एक नाव होती हेही त्यांना ठाऊक होते.
पण मग तिबिर्याहून आणखी काही नावा आल्या. आदल्या दिवशी ज्या ठिकाणी लोकांनी अन्न खाल्ले त्या ठिकाणी त्या नावा येऊन काठाला लागल्या. प्रभू येशूने देवाचे उपकार मानल्यावर लोकांनी भाकरी खाल्ल्या तीच ही जागा होती.
आता येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोकांनी पाहिले. म्हणून लोक नावांमध्ये बसले आणि कफर्णहूमला गेले. त्यांना येशूला शोधायचे होते.
लोकांना येशू सरोवराच्या दुसऱ्या काठावर भेटला. लोक म्हणाले, “गुरुजी, तुम्ही इकडे कधी आलात?”
येशूने उत्तर दिले, “तुम्ही माझा शोध का करता? माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का? मी तुम्हांस खरे सांगतो, तुम्ही मला शोधता, कारण तुम्ही भाकरी खाल्या आणि तुमची तृप्ती झाली.
ऐहिक अन्न नाश पावते. म्हणून नाश पावणाऱ्या अन्नासाठी कष्ट करु नका. परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंतकाळचे जीवन देते, अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा. मनुष्याचा पुत्र ते अन्न तुम्हांला देईल. देव जो पिता याने दाखवून दिले आहे की, तो मनुष्याच्या पुत्राबरोबर आहे.
लोकांनी येशूला विचारले, “आम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात अशी देवाची इच्छा आहे?”
येशूने उत्तर दिले, “तुम्ही जे काम करावे अशी देवाची इच्छा आहे, ते हेच की, देवाने ज्याला पाठविले, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
मग लोक येशूला म्हणाले, “देवाने तुम्हांलाच पाठविले आहे हे पटविण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार कराल? तुम्हांला एखादा चमत्कार करताना जर आम्ही पाहिले तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. तुम्ही काय कराल?
अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला मान्ना खाल्ला. पावित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायाला दिली.”
येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो. मोशेने तुमच्या लोकांना स्वर्गातील भाकर दिली नाही. माझा पिता तुम्हांला खरी स्वर्गीय भाकर देतो.
देवाची भाकर कोणती? देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो, तोच ती भाकर.”
ते लोक येशूला म्हणाले, “महाराज, आम्हांला हीच भाकर नेहमी द्या.”
मग येशू म्हणाला. “मीच ती जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
मी तुम्हांला पूर्वीच सांगितले की, तुम्ही मला पाहिले, तरीही विश्वास ठेवीत नाही.
पिता माझे लोक मला देतो. त्यातील प्रत्येकजण माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्याकाला मी स्वीकारीन.
मी स्वर्गातून खाली आलो, ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. मला पाहिजे ते करायला मी आलो नाही.
देवाने मला दिलेल्या लोकांपैकी एकालाही मी गमवू नये. परंतु त्या सर्वांना मी शेवटच्या दिवशी जिवंत असे उठवायला हवे. ज्याने मला पाठविले त्याची मी हेच करावे अशी इच्छ आहे.
पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्थेक व्यक्तीला अनंतकाळचे जीवन आहे. मी त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी उठवीन, हेच माझ्या पित्याल हवे.”
मग यहुदी लोक येशूविरुद्द कुरकुर करु लागले. कारण “स्वर्गातून खाली आलेली भाकर मी आहे” असे तो म्हणाला.
यहूदी लोक म्हणाला, “हा येशू आहे. आपण त्याच्या आईवडिलांना ओळखतो. येशू तर योसेफाचाच पुत्र आहे. ‘मी स्वर्गातून खाली आलो आहे’ असे तो कसे काय म्हणू शकतो?”
पण येशूने उत्तर दिले, “आपापसात कुरकूर करु नका.
पित्यानेच मला पाठिले आहे. पिताच लोकांना माझ्याकडे पाठवितो, त्या लोकांना मी शेवटच्या दिवशी परत उठवीन. पित्याने जर एखाद्या व्यक्तीला आकर्षित केले नाही, तर ती व्यक्ति माझ्याकडे येऊ शकत नाही.
संदेष्टयांनी असे लिहिले आहे की, ‘देव सर्व लोकांना शिक्षण देईल.’लोक देवाचे ऐकतात आणि त्याच्याकडून शिक्षण घेतात, तेच लोक माझ्याकडे वळतात.
देवाने ज्याला पाठिले त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही देवाला पाहिले नाही. फक्त त्यानेच देवाला पाहिले आहे.
मी तुम्हांला खरे तेच सांगतो, “जो विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळाले आहे.
मी जीवन देणारी भाकर आहे.
तुमच्या वाडवडिलांनी अरण्यांत असताना देवाने दिलेला मान्ना खाल्ला. परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरण पावले.
जी स्वर्गातून उतरते ती भाकर मी आहे. जर ही भाकर कोणी खाईल तर तो कधीच मरणार नाही.
स्वर्गातून खाली उतरलेली जिवंत भाकर मी आहे. जर कोणी ती भाकर खाईल तर तो अनंतकाळासाठी जिवंत राहील. आणि ती भाकर म्हणजे माझे शरीर आहे. जगातील लोकांना जीवन मिळावे मी माझे शरीर देईन.”
नंतर यहुदी आपापसात वाद घालू लागले. ते म्हणाले, “हा मनुष्य आपले स्वत:चे शरीर आम्हांला कसे काय खायला देऊ शकेल?”
येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे शरीर खाल्ले पाहिजे आणि त्याचे रक्त प्याले पाहिजे. जर तुम्ही हे करणार नाही, तर तुमच्यात खरे जीवन नाही.
जो कोणी माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो, त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल. शेवटच्या दिवशी मी त्याला उठवीन.
माझे शरीर खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे.
जो माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो.
पित्याने मला पाठविले. तो जिवंत आहे आणि पित्यामुळे मीही जगतो. म्हणून जो कोणी मला खातो तो माझ्यामुळे जिवंत राहील.
आपल्या वाडवडिलांनी अरण्यांत जी भाकर खाल्ली, त्या भाकरीसारखा मी नाही. त्यांनी ती भाकर खाल्ली परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरुन गेले. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाते तो अनंतकाळ जगेल.”
कफर्णहूम नगरातील सभास्थानात शिक्षण देताना येशूने या सर्व गोष्टी सांगितल्या.
येशूच्या शिष्यांनी हे ऐकले, त्यांपैकी अनेकजण म्हणाले, “हे शिक्षण स्वीकारण्यास फार कठीण आहे. कोण हे शिक्षण मान्य करील?”
आपले शिष्य याविषयी कुरकूर करीत आहेत, हे येशूने ओळखले. म्हणून तो त्यांना म्हणाला. “ही शिकवण तुम्हांला त्रासदायक वाटेल काय?
तर मग मनुष्याचा पुत्र जेथून आला तेथे परत जाताना पाहून तुम्हांला तसेच त्रासदायक वाटेल काय?
शरीराद्दरे मनुष्याला जीवन मिळत नाही. परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हांला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते.
परंतु तुमच्यातील काहीजण विश्वास ठेवीत नाहीत.’ जे लोक विश्वास ठेवीत नव्हते, ते येशूला माहीत होते. येशूला हे अगदी सुरुवातीपासूनच माहीत होते. आणि जो मनुष्य त्याचा विश्वासघात करणार होता, तोही त्याला माहित होता.
येशू म्हणाला, “म्हणूच मी तुम्हांला म्हटले की, जर पिता एखाघा व्यक्तीला माझ्याकडे येऊ देत नसेल तर ती व्यरक्ती येणारच नाही.”
येशूने हे सर्व सांगितल्यावर त्याच्या शिष्यांपैकी बरेच जण त्याल सोडून गेले; येशूच्या मागे जाण्याचे त्यांनी सोडून दिले.
नंतर येशूने आपल्या बारा शिष्यांना विचारले, “तुम्हांलासुद्धा मला सोडून जावेसे वाटते काय?”
शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी आम्ही कोठे जाणार? अनंतकलच्या जीवनाची वचने तर तुमच्याजवळ आहेत.


बुधवार, १३ मे, २०२०

सोडुनि दूर जाऊ नको तू




                                   Lyrics :- सोडुनि दूर जाऊ नको तू


सोडुनि दूर जाऊ नको तू हे प्रभू
जाऊ नको तू दूर

शोधू कुठे तुला प्रभू मी
जाऊ नको तू दूर
जाऊ नको तू दूर

धुंडविले तुज भूतलावरी
तुज जैसा नाही कुणी...(२)

तू माझ्या जिवीचे जीवन
तू माझ्या जिवीचे जीवन
करू नको माझी आशा चूर

सोडुनि दूर जाऊ नको तू हे प्रभू
जाऊ नको तू दूर
जाऊ नको तू दूर

तुची माझा पालनकर्ता
तुझविण नाही आसरा कुणी...(२)

राहू सदा मी तुझिया नयनी
राहू सदा मी तुझिया नयनी
तुजपासुनी ना जावे दूर

सोडुनि दूर जाऊ नको तू हे प्रभू
जाऊ नको तू दूर

शोधू कुठे तुला प्रभू मी
जाऊ नको तू दूर
जाऊ नको तू दूर

जाऊ नको तू दूर...(२)


प्रिय थियफिलस, येशूने जे सर्व काही केले आणि शिकविले त्याविषयी मी पहिले पुस्तक लिहिले.
येशूच्या सुरुवातीपासून ते, तो स्वर्गात जाईपर्यंतच्या संपूर्ण जीवनविषयी मी लिहिले. हे घडण्यापूर्वी येशूने जे प्रेषितनिवडले होते त्यांच्याशी तो बोलला. येशूने प्रेषितांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी जे करायला पाहिजे त्याविषयी सूचना दिल्या.
हे येशूच्या मृत्यूनंतरचे होते. परंतु त्याने प्रेषितांना दाखविले की, तो जिवंत आहे. येशूने अनेक सामर्थ्यशाली कृत्ये करुन दाखवून हे सिद्ध केले. मरणातून उठविले गेल्यानंतर चाळीस दिवसांपर्यंत येशूला प्रेषितांनी पुष्कळ वेळा पाहिले. येशू प्रेषितांशी देवाच्या राज्याविषयी बोलला.
एकदा येशू त्यांच्यासह जेवत बसलेला असताना त्याने सांगितले की, यरुशलेम सोडू नका. येशू म्हणाला, “पित्याने तुम्हांला अभिवचत दिले आहे; मी तुम्हांला त्याविषची पूर्वी सांगितले होते. येथे यरुशलेमात त्याचे अभिवचन मिळण्याची वाट पाहा.
योहानाने लोकांचा पाण्याने बाप्तिस्माकेला. परंतु थोड्याच दिवसांत तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्यानेहोईल.”
सर्व प्रेषित एकत्र जमले होते. त्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, ह्याच काळात यहूदी लोकांना तुम्ही त्यांचे राज्य पुन्हा देणार काय?”
येशू त्यांना म्हणाला, ‘केवळ पित्यालाच तारीख व वेळ ठरविण्याचा अधिकार आहे. ह्या गोष्टीची माहिती असणे तुम्हा कडे नाही.
परंतु पवित्र आत्मा तुम्हांकडे येईल. मग तुम्हांला शक्ति मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही लोकांना माइयाविषयी सांगाल. पहिल्यांदा यरुशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल. नंतर तुम्ही यहूदीया, शोमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल.”
नंतर येशूने प्रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर, तो आकाशात उचलला गेला. प्रेषित हे पाहत असताना येशू ढगाआड गेला. आणि ते त्याला पाहू शकले नाहीत.
येशू दूर जात होता, आणि प्रषित आकाशात पाहत असताना पांढरी वस्त्रे परीधान केलेले दोन पुरुष देवदूत अचानक त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले.
आणि ते दोघे प्रेषितांना म्हणाले, “गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत येथे का उभे राहिलात? हा येशू तुमच्यापासून जसा वर स्वर्गात घेतला गेला व त्याला म्हणजेच येशूला जाताना तुम्ही पाहिलेत त्याच मार्गाने तो परत येईल.”
नंतर प्रेषित जैतुनाच्या डोंगरावरुन यरुशलेमास परत गेले. हा डोंगर यरुशलेमापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.
प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते, त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते: पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब अल्फीचा पुत्र, शिमोन झिलोटम्हणून माहित असलेला आणि यहूदा याकोबाचा पुत्र.
हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते. ते एकाच उद्देशाने सतत प्राथेना करीत होते. काही स्त्रिया, मरीया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते.
काही दिवसांनी विश्वासणान्यांची एक सभा झाली. तेथे सुमारे १२० जण होते. तेव्हा पेत्र उभा राहिला आणि म्हणाला,
“बंधुंनो, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा दावीदाकरवी बोलला ते, काहीतरी घडणे आवश्यक आहे. आपल्या गटातील एक जण जो यहूदा त्याच्याविषयी तो बोलत होता. ते असे की, यहूदा आपल्याबरोबर सेवा करीत होता. आत्मा म्हणाला की, येशूला धरुन देण्यासाठी यहूदा लोकांचे पुढारीपण करील.”
यहूदाला हे वाईट काम करण्यासाठी पैसे देण्याच आले होते. या पैशांनी त्याच्यासाठी शेत विकत घेतले गेले. परंतु यहूदा आपल्या डोक्यावर पडला. त्याचे शरीर तुटले. व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.
यरुशलेमयेथील सर्व लोकांना हे समजले. म्हणून त्यांनी त्या शेताचे नाव हकलदमा असे ठेवले. त्यांच्या भाषेत हकलदमा याचा अर्थ “रक्ताचे शेत” असा होता.
पेत्र म्हणाला, “स्तोत्रसांहितेत यहूदाविषयी असे लिहिले आहे:‘त्याच्या जमिनीजवळ  मातमत्तेजवळ लोक न जावोत; कोणीही तिच्यात वस्ती न करो!’ आणखी असे लिहिले आहे: ‘त्याचा कारभार दुसरा घेवो.’म्हणून आता दुसन्या वयक्तीने आमच्यात आले पाहिजे आणि येशूच्यामरणानंतर झालेल्या पुनरुत्थानाचे साक्षीदार व्हावे, प्रभु येशू आपल्याबरोबर असलेल्या संपूर्ण काळात आपल्या गटात राहिलेल्यांपैकी तो मनुष्य असायला पाहिजे, योहान लोकांचा बाप्तिस्मा करीत असे त्या काळापासून ते येशूला आपल्यातून वर स्वर्गात घेण्यात आले त्या वेळेपर्यंत आपल्यामध्ये राहत असलेल्यांपैकीच हा मनुष्य असला पाहिजे.’
प्रेषितांनी दोन मनुष्यांना गटासमोर उभे केले. एक जण योसेफ बर्सबा होता. त्याचे उपनाव युस्त होते.व दुसरा मत्थिया होता.
प्रेषितांनी प्रार्थना केली, “प्रभु, तू सर्वांची मने जाणतोस. या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहेस हे आम्हांला सांग. यहूदाने या सेवेकडे पाठ फिरवली. आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला.’
नंतर दोघातील एकाची निवड करण्यासाठी प्रेषितांनी फासे सोंगठ्या टाकले. फाशावरुन प्रभुला मत्थिया पाहिजे होता हे दिसून आले. म्हणून तो इतर अकरा शिष्यांसह प्रेषित झाला

Featured Post

आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) मंदिर तुझे सुंदर पावन मंदिर तुझे सुंदर पावन  मनात अमुच्या तुझेच चिंतन  आलो तुझ्या दर्शनाला....

Popular Posts