VASAI CATHOLIC CHURCH SONGS

Vasai Catholic Church Songs Lyrics Available This Site

गुरुवार, १२ मार्च, २०२०

तुझ्या रक्ताच्या धारा





Lyrics :- तुझ्या रक्ताच्या धारा


तुझ्या रक्ताच्या धारा
क्रूसावरती उडाल्या
त्यात धुतली पाप्यांची पाप
त्यांच्या जीवनाच्या
ज्योती उजळल्या...(२)

तुझ्या रक्ताच्या धारा...

गुन्हेगार आहे मी तुझा
दुःख दिधले करूनी पाप
माझ्या पापांची भरूनी मापे
येशू मजला केले तू माफ...(२)

तुझी माया जगा आगळी
तसूव्हर कधी ना ढळली
तुझ्या डोळ्यांची भाषा कळली
तू हृदयांच्या उघडता द्वारा

तुझ्या रक्ताच्या धारा...

जीवन गेले होते वाया
अशी पापांची क्रूर किमया
मिळता तव मयेची छाया
माझी उज्वल झाली ही दुनिया...(२)

महिम्याची महिती कळली
तुजकडे ही पावले वळली
दृष्टी क्रूसावर खिळली
येशु दिसला तेजस्वी तारा

तुझ्या रक्ताच्या धारा...

मी होतो अपराधी मोठा
तुडविल्या काईक काटेरी वाटा
परी आज मिळाला धुळीला
मनाचा अहंकार खोटा...(२)

मी जीवनी झालो हुतार्थ
खरा कळला जगण्याचा अर्थ
एकटा येशु आहे समर्थ
या पापी जगाच्या उद्धारा

तुझ्या रक्ताच्या धारा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) मंदिर तुझे सुंदर पावन मंदिर तुझे सुंदर पावन  मनात अमुच्या तुझेच चिंतन  आलो तुझ्या दर्शनाला....

Popular Posts