VASAI CATHOLIC CHURCH SONGS

Vasai Catholic Church Songs Lyrics Available This Site

गुरुवार, १२ मार्च, २०२०

धन्य महान ईश्वर नाम





Lyrics :- धन्य महान ईश्वर नाम



धन्य महान ईश्वर नाम
प्रभुनामाला कोटी प्रणाम...(२)

धन्य धन्य परमेश्वर पिता
धन्य तयाचा पुत्र महान
धन्य येशूचे पावन शोणित
पवित्र आत्मा धन्य महान
पवित्र त्रैक्या कोटी प्रणाम

धन्य महान ईश्वर नाम
प्रभुनामाला कोटी प्रणाम...॥धृ॥

येशुख्रिस्त सत्येश मनुज सत्
धन्य तयाचे नाम महान
धन्य तयाचे अंतर पावन
धन्य धन्य त्याचे बलिदान
ख्रिस्तप्रसादा कोटी प्रणाम

धन्य महान ईश्वर नाम
प्रभुनामाला कोटी प्रणाम...॥धृ॥

धन्य धन्य महिमामयि माता
धन्य तिचे कौमार्य महान
गर्भी धारण निर्मळ तिचे
ईश्वर माता ती गुणवान
कुमारी माते कोटी प्रणाम

धन्य महान ईश्वर नाम
प्रभुनामाला कोटी प्रणाम...॥धृ॥

धन्य धन्य योसेफ पूज्य तो
मरियावर निर्मळ गुणवान
देवदूत अन् सकल संतगण
भजती ईश्वर नाम महान
प्रभुला अमुचे कोटी प्रणाम

धन्य महान ईश्वर नाम
प्रभुनामाला कोटी प्रणाम...(२)

प्रभुनामाला कोटी प्रणाम...(२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) मंदिर तुझे सुंदर पावन मंदिर तुझे सुंदर पावन  मनात अमुच्या तुझेच चिंतन  आलो तुझ्या दर्शनाला....

Popular Posts