VASAI CATHOLIC CHURCH SONGS

Vasai Catholic Church Songs Lyrics Available This Site

बुधवार, ११ मार्च, २०२०

प्रेमाची ही ज्वाला देवा





Lyrics :- प्रेमाची ही ज्वाला देवा

 

प्रेमाची ही ज्वाला देवा

 तव हृदयी पेटे

तशीच पेटो प्रेमज्योत मम

हृदयी विश्वपते

प्रेमाची ही ज्वाला देवा...॥धृ ॥


जेथे आहे द्वेष तेथे मज

प्रेमा पेरू दे...

अपराध्यांना क्षमा देऊनी

प्रेमे जिंकू दे...

प्रेमाची ही ज्वाला देवा...॥धृ ॥


अशांतिच्या बाजारी मजला

शांती वर्षू दे...

असत् पटल ते दूर सारूनी

सत्या दावू दे...


प्रेमाची ही ज्वाला देवा...॥धृ ॥


श्रद्धाहिन जनतेच्या हृदयी

श्रद्धा निर्मू दे...

वैफल्याचे तिमिर जाळुनी

आशा उजळू दे...


प्रेमाची ही ज्वाला देवा...॥धृ ॥

दुःखाचा संहार करूनी

हर्षा उधळू दे...

सकलदुरितभय दूर सारूनी

सैख्या पसरू दे...

प्रेमाची ही ज्वाला देवा...॥धृ ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) मंदिर तुझे सुंदर पावन मंदिर तुझे सुंदर पावन  मनात अमुच्या तुझेच चिंतन  आलो तुझ्या दर्शनाला....

Popular Posts