VASAI CATHOLIC CHURCH SONGS

Vasai Catholic Church Songs Lyrics Available This Site

बुधवार, ११ मार्च, २०२०

प्रभू मी कोणाचा कोणाचा





Lyrics :- प्रभू मी कोणाचा कोणाचा



प्रभू मी कोणाचा कोणाचा...॥२॥
माझा नच इतराचा...॥२॥
प्रभू मी कोणाचा कोणाचा...॥२॥

तुझाच परि मी घे घे माझी...॥२॥
तन-मन-धन ही वाचा...॥२॥

पापमुक्त तू केले मजला...॥२॥
मज तू निधि करूणेचा...
प्रभू मी कोणाचा कोणाचा...॥२॥

पापांचा मी होतो राशी...॥२॥
सांगु किती त्या जाचा...॥२॥

उद्धारिले तू मज पतिताला...॥२॥
सिंधु देशि अमृताचा...
प्रभू मी कोणाचा कोणाचा...॥२॥

हस्तपाद ही पाच इंद्रिये...॥२॥
आत्मा प्राणहि यांचा...॥२॥

तवाधीन बा झाला झाला...॥२॥
दास मी तव चरणांचा...

प्रभू मी कोणाचा कोणाचा...॥२॥
माझा नच इतराचा...॥२॥
प्रभू मी कोणाचा कोणाचा...॥३॥

1 टिप्पणी:

  1. Beautifully sung. I really remembered my childhood days and old catholic Sadgite. All of you have worked hard and put in great efforts to give rebirth to this old devotional hymn. Congrats for that but I WOULD LIKE TO BRING IT TO YOUR KIND NOTICE THAT ALL THE CREDITS ARE GIVEN. UNFORTUNATELY IT SEEMS YOU HAVE FORGOTTEN TO GIVE CREDIT TO THE POET. PLEASE DO SO WITHOUT THE POET ONLY MUSIC HAS NO MEANING. Thanks and Gbu. Vilas Chakranarayan

    उत्तर द्याहटवा

Featured Post

आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) मंदिर तुझे सुंदर पावन मंदिर तुझे सुंदर पावन  मनात अमुच्या तुझेच चिंतन  आलो तुझ्या दर्शनाला....

Popular Posts