परम इशाला स्वर्गात गौरव
सज्जनांना देव शांती देवो
आम्ही तव स्तुती करितो रे देवा
धन्यवाद नावा देतो सदा
भजन पुजन करितो रे सेवा
महिमा हो गावा मुखे नीत
प्रभो देवपित्या प्रभो परमेशा
विश्वेशा स्वर्गेशा शक्तीशाली
नमवुनि मान होतो ऋणवंत
तूचि भगवंत थोर जगी
प्रभो जगदिशा प्रभो येशूख्रिस्ता
एकुलत्या सुता गुणवंता
जनकनंदना परेशकोकरा
प्रभो दुःखहरा परमेशा
दयेच्या सागरा जगपापहारी
दया आम्हावरी करी त्वरा
पतितपावना जगपापहारी
प्रार्थना स्वीकारी अनाथांची
बैसला पित्याच्या उजव्या हाताशी
तूचि अविनाशी दया करी
परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात
परम पवित्र आत्म्यासह
परम पवित्र तूचि प्रभुवर
तूचि एक थोर येशूख्रिस्त
परम इशाला स्वर्गात गौरव
सज्जनांना देव शांती देवो
सज्जनांना देव शांती देवो
सज्जनांना देव शांती देवो
सज्जनांना देव शांती देवो
आम्ही तव स्तुती करितो रे देवा
धन्यवाद नावा देतो सदा
महिमा हो गावा मुखे नीत
प्रभो देवपित्या प्रभो परमेशा
विश्वेशा स्वर्गेशा शक्तीशाली
तूचि भगवंत थोर जगी
प्रभो जगदिशा प्रभो येशूख्रिस्ता
एकुलत्या सुता गुणवंता
प्रभो दुःखहरा परमेशा
दयेच्या सागरा जगपापहारी
दया आम्हावरी करी त्वरा
प्रार्थना स्वीकारी अनाथांची
बैसला पित्याच्या उजव्या हाताशी
तूचि अविनाशी दया करी
परम पवित्र आत्म्यासह
परम पवित्र तूचि प्रभुवर
तूचि एक थोर येशूख्रिस्त
परम इशाला स्वर्गात गौरव
सज्जनांना देव शांती देवो
सज्जनांना देव शांती देवो
सज्जनांना देव शांती देवो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा