VASAI CATHOLIC CHURCH SONGS

Vasai Catholic Church Songs Lyrics Available This Site

रविवार, १२ एप्रिल, २०२०

ठेवितो विश्वास




                                   


Lyrics :- ठेवितो विश्वास


ठेवितो विश्वास एका परमेशी
पिता सर्वसाक्षी शक्तिवंत
तोचि एक कर्ता स्वर्गधरित्रीचा
दृश्य अदृश्याचा भगवंत

परमइशाचा एकुलता सुत
प्रभु येशूख्रिस्त एक मात्र
पवित्र आत्म्याच्या योगे देहधारी
मरिया कुमारी पासोनीया

आम्हासाठी त्याला क्रुसी खिळीयले
अपार भोगीले दुःखकष्ट
पोन्ती पिलाताच्या अमदानीत हे
घडले अवघे अघटित

तयास पुरूनी झाले दिस तीन
उठे मृत्युतून पुनरपि
चढला स्वर्गात बैसला पित्याच्या
हाताशी उजव्या वैभवाने

करावया न्याय जीवंत मृतांचा
येणार हो साचा पुनरपि
प्रभु पावित्रात्मा जीवदाता देव
यावरि हो भाव ठेवियतो

एकच पवित्र एक कॅथोलिक
एक प्रेषित्तिक ख्रिस्तसभा
पापक्षमेसाठी एकमात्र पुर्ण
स्नानसंस्करण पापनाशी

यावरी हो माझा विश्वास संपूर्ण
प्रभु तू भूषण माझे खरे
मृतांचे उत्थान आगामी जीवन
याकडे नयन अता माझे तथास्तु

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

आलो तुझ्या दर्शनाला देवा

आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला (२) मंदिर तुझे सुंदर पावन मंदिर तुझे सुंदर पावन  मनात अमुच्या तुझेच चिंतन  आलो तुझ्या दर्शनाला....

Popular Posts